भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. किवी संघानं पहिल्या दोन कसोटीत भारताचा दारुण पराभव केला. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येतील.
या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया मुंबई कसोटीत आपल्या अनेक बड्या खेळाडूंशिवाय उतरू शकते. तिसऱ्या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंपैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाज आकाशदीपच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानालाही धोका आहे. त्याला तिसऱ्या कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
अशाप्रकारे, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता मुंबई कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतात, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
या मालिकेबद्दल बोलायचं झाले तर, मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी पुण्यात खेळवण्यात आली. या सामन्यात किवी संघानं भारताचा 113 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे मुंबईतील तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा संघ भारताचा सफाया करण्याच्या इराद्यानं संघ मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघ मुंबई कसोटी जिंकून मालिकेतील क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता या सामन्यात कोणता संघ जिंकेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
केएल राहुलला नारळ! लखनऊ सुपर जायंट्सनं रिटेन केले हे 5 खेळाडू
रणजी ट्रॉफीमध्ये केकेआरच्या गोलंदाजाची धमाल कामगिरी, बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ठोकला दावा
“इंग्लंडच्या फलंदाजांना अक्कल नाही”, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज भडकला