हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. यामुळे भारताचे न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचे स्वप्न भंगले.
हा पराभवाचे कारण भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. त्याचा हा 200वा वन-डे सामना होता. मात्र यामध्ये तो विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.
‘आम्ही खूप काळानंतर आम्ही अतिशय वाईट फलंदाजी केली आहे. याचे श्रेय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाच द्यायला हवे. त्यांच्या स्विंगने फलंदाजांवर दडपण येत होते”, असे रोहित सामन्यांनतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
तत्पूर्वी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा पर्याय निवडला होता. यावेळी भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर हार पत्करली होती. बोल्टने 21 धावा देत 5 तर ग्रँडहोमने 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
बोल्ट-ग्रॅंडहोम समोर भारताला सर्वबाद 92 धावाच करता आल्या. भारताने 2010नंतर प्रथमच 100 धावांपेक्षा कमी धावसंख्या उभारली आहे. 2010 मध्ये भारताला 88 धावांवर सर्वबाद करण्याचा पराक्रम न्यूझीलंड संघानेच केला होता.
आजच्या सामन्यात न्यूझीलंडने 93 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना 2 विकेट्स गमावल्या. तर यावेळी रॉस टेलर आणि हेन्री निकोलस यांनी अनुक्रमे नाबाद 37 आणि नाबाद 30 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!
–२००वा वन-डे सामना आणि विराट-रोहितच्या बाबतीत झाला हा योगायोग
–अखेर विराटचा तो विक्रम मोडण्यात रोहित शर्माला आले अपयश