हॅमिल्टन। सेडन पार्कवर आज (31 जानेवारी) झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव 30.5 षटकात 92 धावांवर रोखला होते.
यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेच भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने 10 षटकांमध्ये 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर भारतासाठी हे मैदान वाईटच ठरले आहेत. या मैदानावर भारताने आतापर्यंत 10 वन-डे सामने खेळले असून त्यातील 3 सामन्यातच भारत विजयी ठरला आहे.
भारताची आजची धावसंख्या ही या मैदानावरील सर्वाधिक निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधीही या मैदानावरील सर्वात निचांकी धावसंख्या करण्याचा विक्रम भारताच्या नावावर होता.
2003मध्ये भारताने या मैदानावर सर्वबाद 122 धावा केल्या होत्या. हा सामना न्यूझीलंडने 6 विकेट्सने जिंकला होता. पण हा नकोसा विक्रमही भारताने 92 धावा करत मागे टाकला आहे.
सेडन पार्क, हेमिल्टन येथे भारताने खेळलेले वन-डे सामने-
1981, न्यूझीलंड विरुद्ध भारत- न्यूझीलंड 57 धावांनी विजयी
1990, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया 7 विकेट्सने विजयी
1992, झिम्बाब्वे विरुद्ध भारत – भारत 55 धावांनी विजयी
2003, न्यूझीलंड विरुद्ध भारत – न्यूझीलंड 6 विकेट्सने विजयी
2009, न्यूझीलंड विरुद्ध भारत – भारत 84 धावांनी विजयी
2014, न्यूझीलंड विरुद्ध भारत – न्यूझीलंड 15 धावांनी विजयी
2014, न्यूझीलंड विरुद्ध भारत – न्यूझीलंड 7 विकट्सेन विजयी
2015, आयर्लंड विरुद्ध भारत – भारत 8 विकेट्सने विजयी
2019 न्यूझीलंड विरुद्ध भारत – न्यूझीलंड 8 विकेट्सने विजयी
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की
–धावा केल्या सातच तरी रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान
–ISL 2018-19: नॉर्थईस्टला हरवित बेंगळुरूची पुन्हा आघाडीला मुसंडी