टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात अवघ्या 46 धावा झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. न्यूझीलंडने 402 धावा करत टीम इंडियावर 356 धावांची आघाडी घेतली होती. पण खेळाच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 3 विकेट गमावून 231 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत आता न्यूझीलंडकडे केवळ 125 धावांची आघाडी शिल्लक आहे. भारताच्या अजून 7 विकेट शिल्लक आहेत. अशाप्रकारे, खेळाच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घेऊया.
चौथ्या दिवशी सरफराजला मोठी खेळी खेळावी लागणार
टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू येथे होणारा कसोटी सामना जिंकायचा असेल, तर सर्फराज खानवर बरेच काही अवलंबून आहे. सर्फराज त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने दुसऱ्या डावात अवघ्या 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच तो त्याच्या शतकापासून फक्त 30 धावा दूर आहे. याशिवाय सर्फराज न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना आरामात खेळत आहे. अशा परिस्थितीत सर्फराज एका टोकावर ठाम राहिल्यास टीम इंडिया हा सामना जिंकू शकते. कारण आता आघाडी घेण्यास टीम इंडिया फक्त 125 धावा मागे आहे.
रिषभ पंत गेम चेंजर ठरू शकतो
विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो. मात्र, तो फलंदाजीसाठी मैदानात येईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी खेळताना पंतच्या पायाला दुखापत झाली. त्याच पायावर त्याची शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पण चांगली गोष्ट म्हणजे तो फलंदाजीचा सराव करताना दिसला. अशा परिस्थितीत रिषभ पंत टीम इंडियासाठी मैदानात उतरला तर न्यूझीलंडचा तणाव वाढणार हे नक्की.
केएल राहुलची कामगिरी मोलाची ठरणार
बेंगळुरू कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी अर्धशतके झळकावून सामना जवळपास बरोबरीत आणला. टीम इंडियाने तीन विकेट्स नक्कीच गमावल्या असल्या, तरी चौथ्या दिवशी मधल्या फळीतील फलंदाज मजबूत राहिले तर त्यांना सामना फिरवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राहुलला केवळ वेगाने धावा काढाव्या लागणार नाहीत तर त्याला आपल्या विकेटचे रक्षणही करावे लागेल.
अश्विन आणि जडेजा यांना फलंदाजीतही ताकद दाखवावी लागणार
बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने तीन विकेट गमावल्या असल्या तरी पण फलंदाजीमध्ये अजूनही सखोलता शिल्लक आहे. सर्फराज खान क्रीजवर उभा आहे. केएल राहुल आणि रिषभ पंत अजून येणे बाकी आहेत. याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत या दोन्ही खेळाडूंना चौथ्या दिवशी संधी मिळाल्यास त्यांना फलंदाजीत आपली पूर्ण ताकद दाखवावी लागेल.
फिरकी गोलंदाजीत ताकद दाखवावी लागेल
सध्या भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष फलंदाजीवर आहे. जर टीम इंडिया खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडला मोठे लक्ष्य देऊ शकली नाही, तर अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाजांना सज्ज राहावे लागेल. कारण चौथ्या डावात फिरकी गोलंदाजाला खेळपट्टीवर खेळवणे सोपे नसेल. अशा स्थितीत सामना संपवण्याचा भार गोलंदाजांवर असेल. अशा स्थितीत भारतीय संघाला याचेही नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा-
रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा विजय, आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाचा सामना
भारताला पाकिस्तानात निमंत्रित करण्यासाठी पीसीबीने वापरली नवी युक्ती! BCCI समोर ठेवली ही ऑफर
Ranaji Trophy; ईशानचे शतक तर सुदर्शनचे द्विशतक, टीम इंडियामध्ये कधी मिळणार स्थान?