आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. सुपर फोर फेरीचा दुसरा सामना भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघात रविवारी (4 सप्टेंबर) खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना 5 विकेट्सने जिंकला आणि ग्रुप स्टेजमध्ये भारताकडून मिळालेला पराभव परून काढला. भारताचा युवा अष्टपैलू दीपक हुड्डा याला पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात निवडले गेले. हुड्डा मोठी खेळी जरी करू शकला नसला, तरी त्याने एक उत्कृष्ट शॉट खेळला, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
भारतीय संघाने या सामन्यात मर्यादित 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या. प्रत्युत्तार पाकिस्तान संघाने हे लक्ष्य 19.5 षटकांमध्ये 5 विकेट्स राखून जिंकला. सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला. अर्शदीप सिंगने टाकलेल्या शेवटच्या षटकात पाकिस्तानने त्यांना विजयासाठी आवश्यक असलेल्या 7 धावा मिळवल्या आणि विजय पक्का केला. दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने भारतासाठी शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने एक अप्पर कट शॉट मारला, जो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे.
हा शॉट हुड्डाने डावाच्या 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सहनैन (Mohammad Hasnain) या सामन्यात गोलंदाजीसाठी आला होता. षटकातील तिसरा चेंडू हसनैनने बाउंस टाकला. दीपक हुड्डासाठी तसे पाहिले तर हा चेंडू खेळणे कठीण होते, पण त्याने यावर अप्रतिम चौकार मारला. त्याने स्वतःचे शरीर 90 अंशाच्या कोणात वळवले आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानच्या डोक्यावरून चौकार हा चौकार मारला.
https://twitter.com/retired_spirit/status/1566455220343050242?s=20&t=8WfG32USuyak94s_y7uPvA
हुड्डाचा हा अनोखा शॉट पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. त्यावेळी दिग्गज विराट कोहली खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला उभा होता आणि तोदेखील हा चौकार पाहून हैराण झाल्याचे दिसले. सुपर फोरमधील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला आता अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने पुढे दोन्ही सामने जिंकावे लागतील. आगामी सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंका संघाविरुद्ध आहे, तर त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी भारताला अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!