---Advertisement---

विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’

Dinesh-Karthik
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ सध्या इंग्लंडमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ माजवताना दिसत आहे. इंग्लंडच्या द हंड्रेड 2023 लीगमध्ये हॅरिस घातक वेगवान गोलंदाजी करत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी ही पाकिस्तानचा हा गोलंदाज भारतासाठी आव्हान उभे करणारा गोलंदाज असल्याचे दिसत आहेत. रौफने जगभरातील क्रिकेटप्रेमींसोबतच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यालादेखील आपली प्रशंसा करायला भाग पाडले आहे. दिनेश कार्तिकने हॅरिस रौफचे कौतुक केले आणि त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शानदार गोलंदाज म्हटले.

काय म्हणाला कार्तिक?
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने हॅरिस रौफ (Haris Rauf) याचे कौतुक करत म्हटले की, “काही वर्षांपूर्वीपर्यंत तो टेनिस चेंडू क्रिकेट खेळत होता. मात्र, पीएसएलमध्ये त्याला लाहोर कलंदर्स संघाने निवडले आणि नंतर तो शानदार गोलंदाज बनत गेला. पाकिस्तानसाठी खेळतानाही त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. तो सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्सच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.”

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1687682063460401158?s=20

विराटने दिलाय चांगलाच चोप
खरं तर, दिनेश कार्तिकने ज्या पाकिस्तानी गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हटले आहे, त्या गोलंदाजाला विराट कोहली (Virat Kohli) याने फलंदाजीतून चांगलाच चोप दिला आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्यादरम्यान विराटने हॅरिसविरुद्ध चांगल्या धावा केल्या होत्या. विराटने अखेरच्या षटकांमध्ये हॅरिसच्या गोलंदाजीविरुद्ध सलग 2 षटकार मारले होते. विराटच्या त्या दोन षटकारांबाबत प्रत्येक चाहता म्हणत होता की, हॅरिसला कुणीही असे शॉट्स मारले नाहीत आणि मारूही शकणार नाही.

हॅरिसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पाकिस्तान संघाकडून 2020मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या हॅरिस रौफ याने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत 22 वनडे आणि 62 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 5.85च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च करत 39 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 8.04च्या इकॉनॉमी रेटने 83 विकेट्स घेतल्या आहेत. हॅरिसने 2018मध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. (ind vs pak indian cricketer dinesh karthik laud pakistan bowler haris rauf ahead asia cup 2023)

महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमीने आवर्जुन वाचावा असा किस्सा: इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद
वेगवान गोलंदाज ते विश्वविजेत्या संघाचा प्रशिक्षक, वेंकटेश प्रसादबद्दल ‘या’ 5 गोष्टी माहितच पाहिजेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---