रविवारी (6 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये आमने सामने आले. पाकिस्तानने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाला या सामन्यात गोलंदाजांची कमतरता भासली. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज संजय मांजरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मांजरेकरांच्या मते भारतीय संघाने हार्दिकला चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात खेळवले पाहिजे.
माध्यामांशी बोलताना संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले की, “मला वाटते पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघाला मोठा धडा मिळाला असेल. मैदानात कर्णधार रोहित शर्मा चिडल्याचे दिसले. त्याने काही महत्वाच्या नोट्स काढल्या असतील आणि संघ व्यवस्थापनाचेही याकडे लक्ष गेले असेल. जर तुम्ही एखाद्या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज घेतले, तर हार्दिक पंड्या (hardik Pandya) त्यामध्ये नसेल. हार्दिक चांगली गोलंदाजी करतो, जेव्हा त्याला माहिती असते की, संघाचा चौथा वेगवान गोलंदाज आहे.” मांजरेकरांच्या मते प्रत्येक दिवस हार्दिकची असू शकत नाही. अशा वेळी रविंद्र जडेजासारखे खेळाडू महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ASIA CUP: ‘अक्षर जडेजाची जागा घेण्याच्या योग्यतेचा नाही, त्यापेक्षा…’ माजी निवडकर्त्याने उचलले सवाल
हार्दिक पंड्या संघाचा पाचवा गोलंदाज बनू शकत नाही, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार