ऑस्ट्रे्लियाला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर भारताला मायदेशातच दक्षिण आफ्रिका सोबत टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना बुधवारी, 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज असल्याचे दिसत आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवूत केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. चला तर जाणून घेऊया या सामन्यात दिसणाऱ्या संभावित प्लेइंग इलेव्हनविषयी.
भारतीय संघालाला त्यांच्या वरच्या फळीकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. मध्यक्रमातील फलंदाज देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे संघाला फलंदाजांविषयी कसलीही चिंता नसेल. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल. गोलंदाजांची विभाग मात्र भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि त्यापूर्वी खेळल्या गेलेल्या आशिया चषकात भारतीय गोलंदाजांनी खूपच निराशाजनक प्रदर्शन केले होते. अशात दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळाताना गोलंदाज कसे प्रदर्शन करतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी दक्षिण आफ्रिकी संघाला देखील दुबळा म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या संघात क्विंटन डी कॉक, टेंबा बावुमा, ऍडन मार्करम, डेविड मिलर आणि कागिसो रबाडा अशा दमदार खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये आफ्रिकी संघ भक्कम दिसत आहे. असे असले तरी, मालिका मायदेशात खेळली जात असल्यामुळे भारताला त्याचा फायदान नक्कीच मिळेल.
संभावित प्लेइंग इलेव्हन (Predicted XI) –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकी – टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, राइली रूसो, ऍडेन मार्करम, डेविड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा
खरंच गंभीरच्या कुत्र्याचं नाव ‘ओरिओ’ आहे? धोनी लाईव्ह आल्यानंतर गंभीरनेही शेअर केलाय व्हिडिओ
केरळ ते मेलबर्न, हवा फक्त किंग कोहलीचीच! विराटच्या भल्यामोठ्या कट आउटचे फोटो व्हायरल