भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासह इतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ राजकोटमध्ये पोहोचला आहे. भारताच्या सपोर्ट स्टाफचे काही सदस्य १६ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार असल्यामुळे संघासोबत नवीन सपोर्ट स्टाफ तयार आहे.
इशान किशनने राजकोटमध्ये पोहोचल्यानंतर संघातील सहकाऱ्यांसोबतचा फोटो इंस्टाग्रमावर शेअर केला आहे. फोटोमध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya), इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिसत आहेत. तिघेही विशाखापटणमध्ये मिळालेल्या विजयानंतर खुश दिसत आहे. विशाखापटणम ते राजकोटच्या प्रवासादरम्यान हा सेल्फी घेतला गेल्याचे दिसत आहे. तिघेही संघाच्या ट्रेनिंग किटमध्ये आहेत.
दरम्यान, भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. परंतु या कसोटी सामन्याच्या आधी संघाला त्याठिकाणी एक सराव सामना खेळावा लागणार आहे आणि यासाठी संघ १६ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होईल. कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील वरिष्ठ खेळाडू सपोर्ट स्टाफच्या काही सदस्यांसह इंग्लंडला रवाना होतील. वरिष्ठ संघ आणि सपोर्ट स्टाफ (Support Staff of India) इंग्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर राहिलेले खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे उर्वरित दोन सामने खेळेल. तसेच एनसीएचा सपोर्ट स्टाफ या भारतीय संघाला प्रशिक्षण देईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना १७ जून रोजी राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी दिलीप हा वरिष्ठ सपोर्ट स्टाफ खेळाडूंसोबत १६ जून रोजी रवाना होणार आहे. तर दुसरीकडे एनसीएचे प्रशिक्षक साईराज बहुतुले, मुनीष बाली आणि सितांशु कोटक राजकोट आणि बेंगलोरमध्ये होणाऱ्या पुढच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला मार्गदर्शन करतील. राहुल द्रविड, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर १९ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार, अशी माहिती सध्या दिली गेली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
विराट-केएल राहुलपेक्षा रिषभ पंत सरस, रोहितच्या अनुपस्थित भारतीय संघासाठी प्रथमच केलं ‘हे’ काम