भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) मोहाली येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) पार पडला. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामना विजयात जडेजाचे मोठे योगदान राहिले. त्याला या सामन्यातील त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले.
जडेजाच्या या सामन्यातील अष्टपैलू प्रदर्शनावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chpora) फिदा झाला आहे. मोहाली कसोटी इथून पुढे जडेजासाठी ओळखळी (Aakash Chopra Praises Ravindra Jadeja) जाईल, अशी मोठी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर जडेजाला सामनावीर म्हणत चोप्राने सांगितले की, “भारत विरुद्ध श्रीलंकेतील मोहालीत झालेला कसोटी सामना जडेजासाठी ओळखला (Mohali Test Will Reminded For Jadeja) जाईल. त्यामुळे या सामन्याचा सर्वश्रेष्ठ खेळाडू जडेजाच असायला पाहिजे. त्याने एकट्याने या सामन्यात १७५ धावा केल्या. याउलट श्रीलंकेचा आख्खा संघ मिळूनही १७५ धावा करू शकला नाही. श्रीलंकेचा संघ एकाही डावात १८० धावा करू शकला नाही. पण जडेजाने एकट्याने १७५ धावा केल्या आणि तो नाबादही राहिला.”
हेही वाचा- मोहाली स्टेडियम रवींद्र जडेजासाठी लकी! जबरदस्त प्रदर्शनानंतर अष्टपैलूने स्वतः सांगितले कारण