भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिका (ind vs wi t20 series) बुधवारी (१६ फेब्रुवारी) सुरू झाली. उभय संघातील टी-२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली जात आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजीदरम्यान असे काही घडले, ज्यामुळे खेळाडूंमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. हे सर्व एका रिव्यूसाठी झाल्याचे दिसले. भारताने या सामन्यात ६ विकेट्स राखून विजय मिळवला.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकमताने रिव्यू घेतला, पण दुसरीकडे पंचांनी हा चेंडू वाइड असल्याचे सांगितले. पदार्पणवीर रवी बिश्नोईने टाकेलल्या आठव्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी वेस्ट इंडीजचा रोस्टन चेज फलंदाजी करत होता. बिश्नोईने टाकलेला एक फिरकी चेंडू चेजच्या पॅडच्या जवळून थेट यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. त्यानंतर रिषभ पंत, रवी बिश्नोई, रोहित शर्मा या सर्वंच खेळाडूंनी पंचांकडे अपिल केली, परंतु पंचांनी त्या चेंडूला वाइड करार दिला.
अशातच माजी कर्णधार विराट कोहली पुढे आला आणि रोहित शर्माला रिव्यू घेण्याचा सल्ला दिला. विराटच्या मते पॅड आणि बॅट असे दोन आवाज आले आहेत. तर दुसरीकडे रोहित मात्र पंचांच्या या निर्णयानंतर हैराण दिसत होता. खास गोष्ट ही होती की रोहितने रिव्यू तर घेतला, पण त्याआधीच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होता
rohit and kohli lol pic.twitter.com/hZqMWPMJd0
— Aarav (@xxxAarav) February 16, 2022
पंचांनी स्टंप्ससंदर्भातील निर्णय आधीच तिसऱ्या पंचांकडे सोपवला होता, परंतु नंतर रिव्यूचा निर्णय घेतला, तर समजले की चेंडू स्टंप्सला लागला होता. अशात रवीला ही विकेट तर मिळाली नाही, पण पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेत चेंडू वाइड नसल्याचे मान्य केले. चेजला जीवनदान मिळाले असले, तरी तो याचा फायदा घेऊ शकला नाही. तो या सामन्यात अवघ्या चार धावा करून बाद झाला.
दरम्यान, भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते अप्रतिम राहिले. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीज संघ १५७ धावा करू शकला. निकोलस पूरनने वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारतासाठी रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येक दोन विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारतासाठी सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मोठी भागीदारी पार पाडली आणि संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी: बेंगाल वॉरियर्सचा मोठा विजय, तमिळ थलाईव्हाजला ३१ गुणांच्या अंतराने दिली मात





