---Advertisement---

कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत-वेस्ट इंडिज संघातील पहिला टी20 सामना? एका क्लिकवर घ्या जाणून

Team-India
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 2 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका पार पडली आहे. या दोन्ही मालिका भारतीय संघाने जिंकल्या. अशात उभय संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला गुरुवारपासून (दि. 03 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसणार आहे. या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी युवा भारतीय खेळाडूंकडे असणार आहे. तसेच, यजमान संघही आपल्या आवडत्या क्रिकेट प्रकारात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल. चला तर, पहिल्या वनडे सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…

यशस्वी जयसवाल की तिलक वर्मा, संधी कुणाला?
कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली पहिल्या टी20 सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडणे सोपे नसेल. कारण, हे पाहणे रंजक ठरेल की, कर्णधार पंड्या यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्यावर विश्वास ठेवतो की, आयपीएल 2023 गाजवणाऱ्या तिलक वर्मा (Tilak Varma) याला संधी देतो. जयसवालचे कसोटी प्रदर्शन शानदार राहिले होते. त्याला जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशन याच्यासोबत शुबमन गिल डावाची सुरुवात करू शकतो. तसेच, सूर्यकुमार यादव आणि पंड्यावर मधल्या फळीत संघाला मजबूती देण्याची जबाबदारी असेल.

अर्शदीप आणि उमरानकडून अपेक्षा
भारताच्या वेगवान गोलंदाजी फळीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करताना दिसेल. तसेच, त्याला उमरान मलिक साथ देऊ शकतो. कर्णधार पंड्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीवर विश्वास ठेवू शकतो. तसेच, अक्षर पटेल बॅट आणि चेंडू दोन्हीमध्ये प्रभावी ठरू शकतो.

भारतीय संघाच्या मागील दोन मालिकांबद्दल बोलायचं झालं, तर भारताने कसोटी मालिका 1-0ने आपल्या नावावर केली होती. तसेच, वनडेत हार्दिकच्या नेतृत्वात भारताने यजमानांना 2-1ने पराभूत केले होते.

सामन्याविषयी सर्वकाही
कधी आणि कुठे खेळला जाईल पहिला टी20 सामना?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला टी20 सामना (India vs West Indies 1st T20I) गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअम (Brian Lara Stadium) येथे खेळला जाईल.

किती वाजता सुरू होईल सामना?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 8 वाजता सुरू होईल. तसेच, नाणेफेक अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच सायंकाळी 7.30 वाजता होईल.

टीव्हीवर कुठे पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला टी20 सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येईल.

सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायची?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ऍपवर पाहू शकता. तसेच, सामन्याचा मोफत आनंद लुटायचा असेल, तर जिओ सिनेमावर सामना पाहू शकता. (ind vs wi 1st t20i match live telecast and streaming all about know here)

महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने केली घोडचूक! डब्ल्यूटीसीच्या पहिल्याच मालिकेत बसला मोठा फटका
धुवाधार खेळी करूनही ईशान किशन नाखुश! केलेली चूक स्वतः बोलून दाखवली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---