---Advertisement---

गावसकर ‘या’ देशाला मानतात आपलं दुसरं घर, सुनील पुकारताच का होतात खुश? घ्या जाणून

Sunil-Gavaskar
---Advertisement---

भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. गावसकरांनी त्यांच्या जबरदस्त फलंदाजीने क्रिकेटमधील मोठमोठे विक्रम नावावर केले आहेत. त्रिनिदाद सोडलं, तर संपूर्ण क्रिकेटविश्व त्यांना प्रेमाने ‘सनी’ किंवा ‘लिटल मास्टर’ म्हणतात. कारण, वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद येथे क्रिकेटपटूंपासून ते क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वजण गावसकरांना सुनील या नावानेच पुकारतात. हे फक्त नावापुरतेच मर्यादित नाहीये. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील खासियत यावरूनही समजली जाऊ शकते की, गावसकर हे आपले दुसरे घर असल्याचेही  मानतात. गावसकरांचे त्रिनिदादशी काय खास नाते आहे? याचा खुलासा त्यांनी केला आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातीलs दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन येथे पार पडला. ही तीच जागा आहे, जिथे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली होती. गावसकरांनी त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले होते. तसेच, भारताने हा सामना जिंकला होता. हा भारताचा वेस्ट इंडिजमधील पहिला विजय होता. गावसकरांनी वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजी माऱ्याचा टिच्चून सामना करत या मालिकेत 774 धावा केल्या होत्या, जो आजही विक्रम आहे. गावसकरांच्या याच प्रदर्शनावर वेस्ट इंडिज त्यांचा दीवाना बनला.

गावसकरांना त्रिनिदादमध्ये सुनील का बोलतात?
त्रिनिदाद (Trinidad) येथे गावसकरांना सुनील का बोलतात? या प्रश्नाचे उत्तर देताना गावसकर म्हणाले की, “हे पाहा, मी वेस्ट इंडिजविरुद्ध 1971मध्ये पदार्पण केले होते. त्या मालिकेत मी खूप धावा केल्या होत्या. पदार्पणाची मालिका असल्यामुळे त्यावेळी माझी खास ओळख नव्हती. त्यानंतर अधिकतर ठिकाणी मला ‘सनी’ नावाने पुकारले जाऊ लागले. मात्र, 1971मध्ये पहिल्या मालिकेत मला इथे सर्वजण सुनील म्हणायचे. आजही इथे लोक मला सुनीलच म्हणतात. मग ते कॉमेंट्री बॉक्स असो किंवा स्टेडिअमच्या बाहेरील कोणतीही जागा. मला माझे सुनील नाव ऐकून चांगलेदेखील वाटते.”

‘त्रिनिदाद माझे दुसरे घर’
भारतापेक्षा जास्त इथल्या लोकांचे तुमच्यावर जास्त प्रेम आहे, असे म्हणणे योग्य ठरेल का? याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “असे म्हणणे योग्य ठरणार नाही. भारतात खूप जास्त लोक आहेत आणि त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मात्र, असे म्हणण्यात काहीच हरकत नाही की, भारतानंतर मला त्रिनिदादमध्ये सर्वात जास्त प्रेम मिळते. त्रिनिदाद माझ्या दुसऱ्या घरासारखे आहे.” हे वृत्त न्यूज18 या वेबसाईटने दिले आहे.

गावसकरांचा सर्वात मोठा विक्रम
गावसकरांच्या नावावर कसोटीतील सर्वात मोठा विक्रम आहे. गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले क्रिकेटपटू आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकूण 125 कसोटी आणि 108 वनडे सामने खेळले. कसोटीत त्यांनी 51.12च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्यांनी 34 शतके, 4 द्विशतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. तसेच, वनडेत त्यांनी 35.14च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. (ind vs wi trinidad and tobago is my second home says former indian cricketer sunil gavaskar)

महत्त्वाच्या बातम्या-
MS Dhoniचे 11 वर्षांपूर्वीचे जॉब ऑफर लेटर व्हायरल, पगाराचा आकडा वाचून धक्काच बसेल
जगातला सर्वात चपळ फिल्डर झाला 54 वर्षांचा, करिअरमध्ये 8000हून अधिक धावा; निवृत्तीनंतर केली बँकेत नोकरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---