कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषकातील पहिला सामना जिंकला. संघाने विश्वचषक अभियानाची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवाचे प्रमुख कारण ठरली भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज. जेमिमाह या सामन्यात सामनावीर ठरली असली तरी पाकिस्तान संघाने केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली.
भारताने नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 4 बाद 149 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने हे मोठे लक्ष्य एक षटक आणि 7 विकेट्स राखून गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी एक एक चेंडू महत्वाचा होता. अशात जर एखादा चेंडू संघाला अधिकचा खेळायला मिळाला, तरत याहून फायद्याचे संघासाठी काहीच असू शकत नाही. पाकिस्तान संघ गोलंदाजी करत असताना भारताला अशाच प्रकारे एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळाला आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने या चेंडूचा पुरेपूर फायदा करून घेतला
भारताला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर संघाने सुरुवातीपासूनच अपेक्षित धावगती कायम ठेवली. डावातील 7 व्या षटकात पंचांकडून मोठी चूक झाली. पाकिस्तानची अनुभवी गोलंदाज निदा दार () या षटकात गोलंदाजी करत होती. तिने या षटकात 6 ऐवजी 7 चेंडू टाकले. षटकातील पहिल्या सहा षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही. पहिल्या सहा चेंडूत भारताने फक्त 6 धावा केल्या होत्या. पण पंचांकडून चेंडू मोजताना झालेली चूक पाकिस्तानला खूपच महागात पडली. निदा दारने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर जेमिमाहने पाँइन्ट्सच्या वरून सीमारेषेपार लावला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी जेमिमाहने सर्वाधिक 53 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत अवघ्या 16 धावांवर बाद झाली. पण रिचा घोषने शेवटपर्यंत जेमिमाची साथ देत नाबाद 31 धावांची खेळी केली. सलामीवीर शेफाली वर्मा आणि विशाखा भाटिया यांनी अनुक्रमे 33 आणि 17 धावांची खेळी केली. (IND w vs PAK w A mistake made by Pakistan in a live match cost Pakistan dearly)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकातून वगळल्यानंतर जेमिमाने केलेला निर्धार, कमबॅक करत मारला पाकिस्तानविरुद्ध विजयी चौकार
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!