आयपीएल २०२१ चे भारतातील आयोजन कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आहे होते. त्यानंतर आयपीएलच्या या हंगामातील उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. या दुसऱ्या टप्प्यात केकेआर संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारा एक फलंदाज जगासमोर आला आहे. त्याने केवळ फलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे असे नाही. त्याचे शिक्षण पाहिले तर, या खेळाडूने शिक्षणातही चांगली कामगिरी केलेली दिसते. केकेआरचा वेंकटेश अय्यर हा तो शिलेदार असून तो आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे फायनँसमध्ये एमबीएची डिग्री आहे. वेंकटेशवर त्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष न करण्याचा दबाव कुटुंबाकडून होता आणि वेंकटेशनेही त्यांचा हा शब्द क्रिकेट खेळण्यासोबतच पाळला.
त्याच्या अवघ्या २ आयपीएल सामन्यातील प्रदर्शनाला पाहता वेंकटेशविषयी दिग्गजांनी असे सांगायला सुरुवात केली आहे की, तो लवकरच भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळताना दिसेल. वेंकटेशव्यतिरिक्त भारतीय संघात आतापर्यंत अनेक खेळाडू होऊन गेले आहेत आणि अद्यापही आहेत, ज्यांनी वेंकटेशप्रमाणेच उच्च शिक्षण घेतले, पण नंतर क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द घडवली. त्याच खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया..
१. रविचंद्रन अश्विन
असे सांगितले जाते की, अश्विनला क्रिकेटमध्ये चांगेल यश मिळण्यामागे त्याच्या इंजीनियरिंगच्या डिग्रीची महत्वाची भूमिका राहिली आहे. अनेकदा त्याने गोलंदाजीबाबत बोलताना ऍंगल आणि अशा काही गोष्टींविषयी चर्चा केली आहे, ज्यामुळे इतर गोलंदाज हैराण झाले आहेत. अश्विनने चेन्नईच्या एसएसएन काॅलेजमधून इनफाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी या विषयात बी. टेक डिग्री मिळवली आहे. यावरवरून हेच स्पष्ट होते की, अश्विनने क्रिकेटप्रमाणेच त्याच्या शिक्षणालाही महत्व दिले होते.
२. जवागल श्रीनाथ
जवागल श्रीनाथचा जन्म मैसूरमध्ये झाला होता आणि ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली गोलंदाजांपैकी एक होते. त्यांनी खेळळेल्या ४ विश्वचषकांमध्ये (१९९२, १९९४, १९९९, २००३) त्यांनी एकूण ४४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांचे शिक्षण मैसूरच्या श्री. जयचमाराजेंद्रा काॅलेजमधून इंजीनियरिंगमध्ये झाले होते आणि त्यांनी इंस्ट्रूमेंटेशन टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री मिळवली आहे.
३. अनिल कुंबळे
अनिल कुंबळे भारतीय संघाचे दिग्गज गोलंदाज असून त्यांनी भारतीय संघासाठी किती महत्वाची भूमिका पार पाडल्या आहेत ,हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ते केवळ भारताचे नाही तर विश्व क्रिकेटमधील एक महान गोलंदाज आहेत. त्यांनी त्यांचे ग्रॅजुएशनपूर्वीचे शिक्षण नॅशनल काॅलेज बसावनागुडी येथून पूर्ण केले होते. तसेच १९९१-९२ राष्ट्रीय काॅलेज ऑफ इंजीनियरिंग येथून त्यांनी त्यांनी मेकॅनिकल इंजीनियरिंगची डिग्री मिळवली आहे.
४. राहुल द्रविड
द्रविड भारतीय क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे. असे असले तरी त्याने त्याच्या शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष दिलेले दिसते. यामागे त्याची आई पुष्पा स्वत: बेंगलोरच्या यूवीसीई काॅलेजमध्ये प्राध्यापक असल्याचे कारण असू शकते. द्रविडकडे बॅचलर ऑफ काॅमर्सची डिग्री आहे आणि त्याने हे शिक्षण जोसेफ स्कूलमधून पूर्ण केले आहे.
५. मुरली विजय
तमिळनाडूचा मुरली विजय क्रिकेटमध्ये जेवढ्या चांगल्याप्रकारे सलामी करायचा, त्याचप्रमाणे त्याने शिक्षणाच्या मैदानातही चांगली कामगिरी केली आहे. असे असले तरी क्रिकेटमुळे त्याचे १२ वी पर्यांतचे गुण पाहिले तर ते समाधानकारक नाहीत. मात्र, त्यानंतर त्याला शिक्षणाचे महत्व समजले आणि चेन्नईच्या विवेकानंद काॅलेजमध्ये दाखला घेतला. त्याच्याकडे इकाॅनाॅमिक्समध्ये बॅचलर आणि फिलाॅसफीमध्ये मास्टर डिग्री आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सवर दु:खाचा डोंगर! ‘या’ माजी खेळाडूच्या वडिलांचे निधन, क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
‘असा’ कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी
टी२० विश्वचषक: भारताची निवड चुकली? प्रमुख खेळाडू युएईत सपशेल फ्लॉप, मात्र राखीव खेळाडूंचा गाजावाजा