सध्या न्यूझीलंड ए क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. इंडिया ए संघाविरुद्ध ते प्रथमश्रेणी व वनडे सामन्यांची मालिका खेळत आहेत. प्रथमश्रेणी मालिकेत विजय मिळवल्यानंतर आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही इंडिया ए संघाने विजयी आघाडी घेतली आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंडिया ए संघाने 4 गडी राखून विजय संपादन केला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याने घेतलेली हॅट्रिक व पृथ्वी शॉ याची आक्रमक फलंदाजी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
India A Won by 4 Wicket(s) #IndAvNzA #IndiaASeries Scorecard:https://t.co/uJ8xPJpAri
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 25, 2022
चेन्नई येथे सुरू असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड ए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले दोन गडी लवकर बास झाल्यानंतरच रचिन रवींद्र व जो कार्टर यांनी अर्धशतके पूर्ण केली. रचिनने 61 तर कार्टरने 72 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अनुभवी कुलदीप यादवने अखेरच्या तीनही फलंदाजांना सलग बाद करत हॅट्रिक नोंदवली. त्यामुळे न्यूझीलंड ए संघाला 219 धावांवर सर्वबाद केले. सर्वाधिक चार बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघाला पृथ्वी शॉ व ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक सुरुवात दिली. गायकवाड 30 तर रजत पाटीदार 20 धावा करून बाद झाले. पृथ्वीने 48 चेंडूंवर आक्रमक 77 धावांची खेळी केली. संजू सॅमसन यानेदेखील 37 धावांचे योगदान दिले. सामन्याच्या अखेरीस रिषभ धवन व शार्दुल ठाकूर या दोन्ही अष्टपैलूंनी 42 धावांची भागीदारी करत संघाला विजयी केले. मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11