भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या सामन्याची तारीख उघड झाली आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या स्पर्धेसाठी गटांची घोषणा केली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वर्षी ओमान आणि यूएईमध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे सामने १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. एकूण १६ संघ या विश्वचषकात खेळतील.
या दिवशी होणार आयोजन
एका प्रमुख वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी या दोन संघांमध्ये विश्वचषकातील साखळी फेरीचा सामना होईल. आयसीसी टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे चाहत्यांना नेहमीच आकर्षण असते. हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत.
भारतात होणार होता विश्वचषक
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सदर विश्वचषक भारतात होणार होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ हंगामाच्या मध्यभागी निलंबनामुळे बोर्डला स्थळ बदलणे भाग पाडले. भारतात कोविड-१९ ची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात व्हायरसची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टी२० विश्वचषक देखील त्याच वेळी होईल. अशा परिस्थितीत हा विश्वचषक भारतात आयोजित करण्याचा निर्णय अत्यंत जोखमीचा मानला जात होता.
हे संघ होणार सहभागी
मुख्य विश्वचषक स्पर्धेआधी आठ संघांत पात्रता फेरी खेळवली जाईल. त्यामध्ये दोन्ही गटातून अव्वल राहिलेले प्रत्येकी दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीच्या अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड व नामिबिया तर, ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान यांचा समावेश आहे. यामधून अव्वल चार संघ मुख्य स्पर्धेत खेळतील.
मुख्य स्पर्धेतील गटवारी (सुपर १२):
अ गट- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अ १, ब २.
ब गट- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ब १, ए २.
महत्त्वाच्या बातम्या –
ENGvIND: इंग्लंडविरुद्ध दम दाखवत ‘हे’ ४ भारतीय खेळाडू संघाला करुन देणार विजयी सुरू
आरंभ है प्रचंड! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडला धोबीपछाड देण्यास विराटसेना सज्ज, बघा तयारीचा व्हिडिओ