भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी कंबर कसली आहे. भारत-पाकिस्तान संघातील सामना श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्यांदाच आमने-सामने असतील. मात्र, दोन्ही संघांनी या मैदानावर अनेक वनडे सामने खेळले आहेत. चला तर, या मैदानावरील भारत आणि पाकिस्तान संघांची आकडेवारी पाहूयात…
पल्लेकेले मैदानातील भारत आणि पाकिस्तानची आकडेवारी
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम (Pallekele International Cricket Stadium) येथील मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने यजमान श्रीलंका संघाला पराभवाची धूळ चारली आहे. 2012मध्ये झालेल्या सामन्यात भारताने 20 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 2017मध्ये भारताने 2 सामने अनुक्रमे 3 आणि 6 विकेट्सने जिंकले होते.
पाकिस्तान जिंकलाय दोनच सामने
दुसरीकडे पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी एकूण 5 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागेल आहे, तर 2 सामनेच जिंकण्यात यश आले आहे. या मैदानावरील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 110 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. 2011मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेला 7 विकेट्सने पराभूत केले होते. 2012मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 2 सामने खेळले होते. संघाला त्यात 1 विजय आणि 1 पराभव पत्करावा लागला. 2015मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला दोन विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
मैदानातील आकडेवारी काय?
पल्लेकेले मैदानाच्या आकडेवारीविषयी बोलायचं झालं, तर इथे आतापर्यंत 34 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 14 सामन्यात विजय, तर नंतर खेळणाऱ्या संघाला 19 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच, एक सामन्याचा निकाल लागला नाहीये. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या कँडी येथे 248 राहिला आहे. तसेच, दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 201 राहिली आहे.
एकूण वनडे सामने- 34
प्रथम फलंदाजी करणारा संघ- 14 सामन्यात विजय
नंतर फलंदाजी करणारा संघ- 19 वेळा विजय
पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या- 248 धावा
दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या- 201 धावा
सर्वाधिक धावसंख्या- 363/7, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका
सर्वात लहान धावसंख्या- 70/10, झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका
सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग- 314 धावा, श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
सर्वात लहान धावसंख्येचा बचाव- 206 धावा, वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका
नाणेफेक जिंकणारा संघ काय करणार?
पाऊस पडण्याच्या शक्यतेच्या स्थितीत नेहमीच नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असते. सुरुवातीला खेळपट्टीवर ओलाव्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होते. यासोबतच डकवर्थ लुईस नियम वापरण्याची वेळ आल्यावर नंतर फलंदाजी केल्यावर संघाला आव्हानाविषयी देखील माहिती असते.
अशात भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पावसाच्या नावावर होतो, की सामना पूर्ण षटकांचा खेळवला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (india and pakistan record at pallekele international cricket stadium asia cup 2023 ind vs pak)
हेही वाचाच-
‘…तर पाकिस्तान संघ अडचणीत सापडू शकतो’ भारत-पाक सामन्यापूर्वी अख्तरची धक्कादायक भविष्यवाणी
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा