भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असले की, क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ भारतीय चाहते आतुरतेने त्या सामन्याची वाट पाहत असतात. तसेच येत्या 24 तासात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने असणार आहेत. वास्तविक भारत-पाकिस्तान हा सामना आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण सामना कधी, कुठे पाहायचा हे जाणून घेऊया.
सेमीफायनल पर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ शनिवारी (14 सप्टेंबर) रोजी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. गतविजेता भारतीय संघ 4 सामन्यात 4 विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पाकिस्ताननेही आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1 आणि कोरियाचा 3-1 असा पराभव केला. दुसरीकडे ताहिर जमानच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने मलेशिया आणि कोरियासोबत 2-2 अशी बरोबरी साधली. याशिवाय जपानचा 2-1 आणि चीनचा 5-1 असा पराभव झाला.
भारत-पाकिस्तान (India And Pakistan) यांच्यातील सामना (14 सप्टेंबर 2024) रोजी दुपारी 1:15 वाजता सुरू होणार आहे. हा सामना सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर दिसणार आहे. त्याच वेळी, हा सामना सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रसारित केला जाणार आहे.
भारतीय संघ- हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अभिषेक, अली अमीर, अरिजित सिंग हुंदल, सूरज कारकेरा (गोलकीपर), पाल राज कुमार, कृष्ण बहादूर पाठक (गोलरकीपर), विवेक सागर प्रसाद, राहिल मोहम्मद, अमित रोहिदास, संजय, नीलकंठ शर्मा, गुरज्योत सिंग, जरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, मनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, उत्तम सिंग, विष्णुकांत सिंग, सुमित
पाकिस्तान संघ- अब्दुल रहमान, अहमद अजाझ, अली गझनफर, बट अम्माद (कर्णधार), हम्मुद्दीन मुहम्मद, हयात जिकिरिया, खान अब्दुल्ला इश्तियाक (गोलकीपर), खान सुफियान, लियाकत अर्शद, महमूद अबू, नदीम अहमद, कादिर फैसल, राणा वाहीद अश्रफ, रज्जाक सलमान, रुम्मान, शाहिद हन्नान, शकील मोईन, उर-रहमान मुनीब (गोलकीपर)
महत्त्वाच्या बातम्या-
मायकल वॉनच्या मुलाची धमाल, 11 विकेट घेऊन एकहाती जिंकवला सामना!
संघ जिंकल्याच्या आनंद, चक्क कुबड्या घेऊन मैदानात धावत खेळाडूचं भन्नाट सेलिब्रेशन
एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतरच मी क्रिकेटला अलविदा करेन; 35 वर्षीय क्रिकेटपटूचे विधान