मुंबई । भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. पण आता त्याला नव्या पद्धतीने क्रिकेटची सेवा करायचे ठरविले आहे. सुरेश रैना आता देशातील नवीन प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्याचे काम करणार आहे. जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटला प्रोत्साहन देणे हे त्यांचे पुढील उद्दीष्ट आहे, जिथे त्याला गरीब क्रिकेटपटूंना मदत करायची आहे.
15 ऑगस्ट रोजी एमएस धोनीबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप येणाऱ्या रैनाला, जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या खेळाचा प्रसार करायचा आहे. यासाठी त्याने जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांना पत्र लिहून गरीब क्रिकेटपटूंना मदत करणार असल्याची कल्पना दिली आहे. तो म्हणाला की, “ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हे आपले लक्ष्य आहे.”
सुरेश रैनापूर्वी भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने जम्मू-काश्मीरमधील अनेक प्रतिभावंत खेळाडू शोधून काढले आहेत.
आयपीएलमध्ये देखील जम्मू-काश्मिरचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल समदवर सगळ्याची नजर असणार आहे, जो सनरायझर्स हैदराबाद संघाचा एक भाग आहे. मागील सत्रात रसीख सलामनेही मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते.
सुरेश रैना आयपीएल खेळण्यासाठी आपल्या संघासमवेत दुबईमध्ये दाखल झाला आहे. अचानक निवृत्ती घेऊन त्याने क्रिकेट जाणकारांसह क्रिकेटप्रेमींना देखील आश्चर्यचकीत केले. आयपीएलमध्ये तो धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघात खेळतो. तो गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर होता. राष्ट्रीय संघात पुनरागमनाची संधी न भेटल्याने अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
रखवालदाराचा मुलगा झाला आयपीएलमधला टॉप क्रिकेटर, मोदीही घेतात त्याचे नाव
बाप क्रिकेटर विराट कोहली होणार बाबा, इंस्टाग्रामवरुन केली घोषणा
ट्रेंडिंग लेख –
कसोटी डावात ५० चौकारांचा पाऊस पाडणारा जगातील एकमेव अवलिया, आजही आहे विक्रम अबाधित
८ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद
मॅगी खायलाही एकवेळ तरसणारा क्रिकेटर आज आहे मुंबई इंडियनच्या टॉप प्लेअर