महिला क्रिकेटची आशियातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महिला आशिया चषकाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा सामना संयुक्त अरब अमिरातीशी (युएई) झाला. भारतीय संघाने अक्षरशः या सामन्यावर वर्चस्व गाजवत तब्बल 104 धावांनी विजय संपादन केला. जेमिमा रॉड्रिग्ज व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांची अर्धशतके भारतीय डावाची वैशिष्ट्ये ठरली. भारताचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे.
.@JemiRodrigues scored a superb 7⃣5⃣* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat UAE. 👏 👏 #AsiaCup2022 | #INDvUAE
Scorecard ▶️ https://t.co/Y03pcauSKo pic.twitter.com/h3TGNvduaO
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2022
सिल्हेट येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर व शफाली वर्मा यांना या सामन्यात विश्रांती दिली गेली होती. हरमनप्रीतच्या जागी स्मृती मंधानाने संघाचे नेतृत्व केले. भारतीय संघाची अवस्था एकवेळ 3 बाद 19 अशी झालेली असताना दीप्ती शर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी करत 129 धावांची भागीदारी रचली. दीप्तीने 49 चेंडूवर 64 तर जेमिमाने 45 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावांचा तडाखा दिला. पूजा वस्त्रकार व किरण नवगिरे यांनी उपयुक्त योगदान देत भारतीय संघाला 5 बाद 178 पर्यंत मजल मारून दिली.
या भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना युएईने विजयासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही. त्यांनी केवळ शांतपणे फलंदाजी करण्यावर भर दिला. युएईने संपूर्ण 20 षटके फलंदाजी करताना 4 बाद 74 धावा बनविल्या. कविशा एगोडागेने नाबाद 30 धावांची खेळी केली. भारतासाठी राजेश्वरी गायकवाडने दोन तर डी हेमलताने एक बळी मिळवला. जेमिमा रॉड्रिग्जला तिच्या आक्रमक खेळासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला तर दुसऱ्या सामन्यात मलेशियाला पराभूत केले होते. भारतीय संघाचे उर्वरित दोन सामने यजमान बांगलादेश व पाकिस्तान विरुद्ध होणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ढगाळ वातावरणात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, वाचा पावसाविषयीचा अंदाज
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये