आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान संघात खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. दरम्यान भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले.
भारताने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 45 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. विराटने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले नाही, तर भारताचा 6 विकेट्सने विजयही निश्चित केला.
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील त्याचे 51 वे शतक झळकावले आहे. वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत विराटने आधीच आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 82 वे शतक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 14,000 धावाही पूर्ण केल्या.
भारतासाठी स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर अष्टपैलू हार्दिक पांड्याने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. वेगवान गोलंदाज हर्षित राणार, फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स आपल्या नावावर केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सहावा सामना होता. याआधी दोन्ही संघ एकूण 5 वेळा आमनेसामने आले होते, त्यापैकी पाकिस्तानने 3 वेळा आणि भारताने फक्त 2 वेळा विजय मिळवला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 3-3 अशा बरोबरीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs PAK: रोहित शर्माने रचला इतिहास..! महान फलंदाजाला टाकले मागे
शाहीनचा रोहितला क्लीन बोल्ड; पत्नी रितिकाच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याला विजेतेपद






