क्रिकेटटॉप बातम्या

नाद नाद नादच! भारताचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात विश्वविक्रम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्याच सामन्यात विश्वविक्रम रचला आहे. भारतीय महिला संघाने हा विक्रम सोमवारी (दि. 16 जानेवारी) बेनोनी येथे पार पडलेल्या यूएईविरुद्धच्या सामन्यात रचला. विशेष म्हणजे, असा विक्रम करणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे. यासोबतच आणखी एक विक्रम भारतीय महिलांनी नोंदवला आहे. काय आहेत, हे दोन्ही विक्रम चला जाणून घेऊया…

भारतीय संघाचा विश्वविक्रम
भारतापुढे 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील 9व्या सामन्यात यूएई महिला (UAE Women) संघाचे आव्हान होते. या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला येत भारतीय महिला (India Women) संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 219 धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान पार करण्यात यूएई संघ अपयशी ठरला. त्यांना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 97 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 122 धावांनी खिशात घातला. यासह भारताच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला.

भारतीय संघ 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकात 200 धावांचा टप्पा पार करणारा पहिला संघ ठरला. असा विक्रम यापूर्वी कुठल्याही संघाला करता आला नव्हता.

शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावतचा कारनामा
भारतीय महिला संघाच्या सलामीवीर शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि श्वेता सेहरावत (Shweta Sehrawat) यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. या जोडगोळीने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकातील पहिली वहिली शतकीय भागीदारी रचली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.

भारतीय संघाकडून खेळताना शेफाली आणि श्वेताने पहिल्या 8 षटकातच 101 धावांची शतकी भागीदारी रचली होती. यावेळी शेफालीने 31 चेंडूत 68 आणि श्वेताने 17 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले होते. एकूण डावाविषयी बोलायचं झालं, तर शेफालीने 34 चेंडूत 78 धावांचे योगदान दिले, तर श्वेताने 49 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. (India becomes the first ever team to score 200 runs in U-19 Women’s World Cup)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिलांच्या 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; शेफाली बनली ‘प्लेअर ऑफ द मॅच’
शतक ठोकल्यानंतर फिल्डिंगला आला गिल; पठ्ठ्याला पाहून चाहतेही म्हणाले, ‘सारा…सारा’

Related Articles