पुरूष क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियामध्ये आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) महासंग्राम सुरू आहे. त्यामध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हायव्होल्टेज सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने विजय मिळवला आणि भारताच्या टी20 विश्वचषकाच्या प्रवासाला उत्तम सुरूवात झाली. पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी याची झळ मात्र ऑस्ट्रेलियन संघाला पोहोचली आहे.
झाले असे की, भारताने ऑस्ट्रेलियाचा 19 वर्ष जुना विक्रम मोडण्याची कामगिरी केली. यावर्षी भारतीय पुरूष क्रिकेट संघ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा संघ ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा या वर्षातील 39वा विजय होता. 2003मध्ये रिकी पॉटिंग (Rickey Ponting) याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एका वर्षात 38 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याला आता भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली मागे टाकले आहे. भारतीय संघ यावर्षी अजून खूप सामने खेळणार आहे. ज्यामुळे भारताचा हा विक्रम मोडणे भविष्यात सोपे नसेल. most international cricket matches won by team in a year
पॉटिंगने जेव्हा 2003मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भुषविले होते तेव्हा संघाने 30 वनडे आणि 8 कसोटी सामने जिंकत विक्रम आपल्या नावावर केला होता. भारताने 2022मध्ये आतापर्यंत दोन कसोटी, 13 वनडे आणि 24 टी20 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. भारत याआधी या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. भारताने 2017मध्ये 37 सामने जिंकले होते.
भारतासाठी या वर्षाची सुरूवात चांगली झाली नव्हती. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात सुरूवातीचे दोन कसोटी सामने गमावले, त्याच दौऱ्यात केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे मालिका 0-3 अशी गमावली.
भारताचे सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सुपर 12चे 4 सामने खेळण्याचे बाकी आहे. त्यातच भारत त्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचला तर अतिरिक्त दोन सामने खेळेल. त्यानंतर भारत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे ज्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार असून तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वर्षाच्या शेवटी भारत बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकांमध्ये विराटचं झळकतो! डिविलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच