विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे. आपण या मैदानावरील भारतीय संघाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीबाबत जाणून घेऊया.
अशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी
मालिकेतील पहिला सामना नॉटिंघमच्या ज्या ट्रेंट ब्रिज मैदानवर होणार आहे, त्या मैदानावरील भारतीय संघाचे आकडेवारी आशादायी दिसून येते. या मैदानावर भारतीय संघाने आत्तापर्यंत ७ सामने खेळले असून त्यामध्ये दोन विजय व दोन पराभव संघाला पत्करावे लागले आहेत. तर तीन सामने अनिर्णित राहिले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेतील पहिल्याच सामन्यात आत्मविश्वासाने उतरू शकतो.
मागील दौऱ्यावर मिळवला होता विजय
भारतीय संघाने २०१८ मध्ये देखील आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात याच मैदानावरून केली होती. त्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने शानदार फलंदाजी केलेली. विराटने पहिल्या डावात ९७ तर, दुसऱ्या डावात १०३ धावांची शतकी खेळी करत भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळलेली. या सामन्यात भारतीय संघाने २०३ धावांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत पुढील चारही सामने जिंकत मालिका खिशात घातलेली.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ
पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा
मोठी बातमी! भारताविरुद्धच्या लढतीनंतर श्रीलंकेच्या ‘या’ ३३ वर्षीय क्रिकेटरने घेतली निवृत्ती