भारत-पाकिस्तान सामन्याबाबत लोकांमध्ये उत्कंठा तयार झाली आहे. टी-२०आशिया कप (Asia Cup 2022) २७ ऑगस्टपासून युएई मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या मुख्य फेरीत एकूण ६ संघ सहभागी होत आहेत. २८ ऑगस्ट रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट फेरीचा सामना होणार आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाची सुरुवात खराब केली होती. त्याने पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद केले. नंतर त्याने विराट कोहलीची विकेटही घेतली. पाकिस्तानने हा सामना १० विकेटने जिंकला. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानच्या संघाला भारताचा पराभव करण्यात यश आले होते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने टीम इंडियाला शाहीन आफ्रिदीपासून घाबरू नका, असा सल्ला दिला आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला की, “शाहीन आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. त्यांना एवढेच माहित असणे आवश्यक आहे की शाहीन फुलर गोलंदाजी करताना आणि चेंडू स्विंग करताना दिसेल. त्यामुळे त्यांनी त्यासाठी तयार असले पाहिजे.”
सूर्यकुमारकडून शिकायला हवे
तो म्हणाला की, भारतीय फलंदाजांना अशा प्रकारचा चेंडू शरीराच्या अगदी जवळ खेळावा लागतो. शाहीनच्या गोलंदाजीसमोर सूर्यकुमार यादवचे स्क्वेअर लेगवरील फ्लिक शॉट्सही महत्त्वपूर्ण ठरतील. अशा परिस्थितीत फलंदाजांनी त्याच्याकडून शिकण्याची गरज आहे. डावखुऱ्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज निश्चितच थोडे अडचणीत दिसले आहेत. यापूर्वी इंग्लंडचा रिस टोपली आणि वेस्ट इंडिजचा ओबेड मॅकॉय यांनीही खूप त्रास दिला होता.
आशिया चषक दुसऱ्यांदा टी-२० प्रकारात खेळवला जात आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. टीम इंडियाने २०१६मध्ये पहिल्यांदा टी-२० आशिया चषक जिंकला होता. त्याने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा टीम इंडियाला अशीच कामगिरी करायला सज्ज आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”
सिकंदर रजाचे छातीठोक सेलिब्रेशन! शतकी खेळीच्या जोरावर संघाला मिळवून दिला विजय
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर