fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचे फिल्डींग कोचही नाहीत मागे, कोरोना बाधितांसाठी केली अशी मदत

भारतातील अनेक क्रिकेटपटू कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मदतीसाठी पुढे सरसावले आहे. आता क्रिकेटपटूंबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ४ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘एक भारतीय नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य करत आहे. मी पंतप्रधान सहाय्यता निधीला २ लाख रुपये देत आहे. तसेच १.५ लाख रुपये मी तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि ५० हजार रुपये सिंकदराबाद कँट बोर्डला देणार आहे.’

यापूर्वी सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली या भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोनाग्रस्तांसाठी दान केले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयनेही ५१ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर अनेक राज्य क्रिकेट संघटनाही मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कोरोना बाधितांना मदत करणारी ही ठरली पहिली आयपीएल टीम

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने केले महाराष्ट्र सरकारचे जोरदार कौतूक

कोरोना बाधितांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू

You might also like