fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोहलीच्या टीम इंडियाने सहाव्यांदा दिला विरोधी संघाला फॉलोऑन, काय आहे याआधीचा इतिहास?

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारताने पहिल्या डावातील 322 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटीमध्ये प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याची ही सहावी वेळ आहे.

याआधी विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिलेल्या पाचही सामन्यात भारतीय संघाने पराभव स्विकारलेला नाही. तसेच त्यातील चार सामने भारताने एका डावाने जिंकले आहेत. तर एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला आहे.

त्याचबरोबर भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये याआधी 1986 मध्ये फॉलोऑन दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळीही भारताने सिडनी कसोटीतच आणि 6 जानेवारीलाच ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला होता. तो सामना अनिर्णित राहिला होता.

सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला होता. त्याच्या प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 300 धावाच करता आल्या आहेत.

या डावात भारताकडून कुलदीप यादवने 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट् आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला दिलेले फॉलोऑन – 

2015 – विरुद्ध बांगलादेश, फतुल्लाह (अनिर्णीत)

2016 – विरुद्ध विंडीज, नॉर्थ साउंड (विजय)

2017 – विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (विजय)

2017 – विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले (विजय)

2018 – विरुद्ध विंडीज, राजकोट (विजय)

2019 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी (??)

महत्त्वाच्या बातम्या:

कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले

३३ वर्षांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून आला हा खास योगायोग

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

You might also like