Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द्रविडला गोष्टी बदललेल्या आवडत नाही म्हणतात, तेच खरे! संघाच्या जुन्या प्रथेची पुन्हा केली सुरुवात

November 25, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


प्रत्येक क्रिकेटपटूसाठी त्याच्या देशासाठी खेळलेला पहिला सामना खास असतो. प्रत्येक खेळाडूसाठी त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण आठवणीत राहण्यासारखे असते. गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरला त्याचे कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अशात संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने श्रेयसचे पदार्पण अधिकच खास बनवले. द्रविडने या सामन्यापासून संघाच्या जुन्या परंपरा पुन्हा सुरू केली आहे.

पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यरला माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय कसोटी संघाची कॅप दिली आणि त्याला शुभेच्छा दिल्या. राहुल द्रविडने गावसकरांना श्रेयसला ही कॅप देण्यासाठी आमंत्रित केले होते. द्रविडने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय संघात मागच्या काही वर्षांपासून बंद पडलेली परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

द्रविडने भारतीय संघातील माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. श्रेयस आता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ३०३ वा खेळाडू ठरला आहे, ज्याने देशासाठी कसोटी संघात पदार्पण केले आहे.

यापूर्वी न्यूझीलंविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलला ही कॅप देण्यासाठी द्रविडने भारताचा माजी गोलंदाज अजित अगरकरला आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियामध्ये देखील माजी दिग्गजांच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा आहे.

मात्र भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या कार्यकाळात भारतीय संघातील ही परंपरा बंद पडली होती. या दरम्यानच्या काळात संघाचा कर्णधार किंवा वरिष्ठ खेळाडू पदार्पण करणाऱ्या खेळाडूला ही कॅप द्यायचे. पण राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ही प्रथा पुन्हा सुरू केली आहे.

संघातील माजी खेळाडूंकडून युवा खेळाडूंना पदार्पणाची कॅप देण्याची प्रथा भारतीय संघाचे माजी गोलंदाज अनिल कुंबळेंच्या कार्यकाळात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर रवी शास्त्रींच्या कार्यकाळाता ही प्रथा जवळपास बंदच पडली होती. शास्त्री-विराट युगात संघात नव्याने सामील होणाऱ्या खेळाडूंना संघामधीलच एखादा खेळाडू ही कॅप देत असायचा. राहुलने मात्र शास्त्रींनंतर ही प्रथा पुन्हा आधीप्रमाणे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सचे सह-संघमालक यूएई टी२० लीगमध्ये खरेदी करणार आहेत संघ, तयारीही झालीय पूर्ण

कानपुर कसोटीत घडला अद्भुत योगायोग, दोन मुंबईकर प्रतिस्पर्धी बनून आले आमने-सामने

धक्कादायक! फ्रान्सच्या स्टार फुटबॉलपटूला १ वर्षाची शिक्षा, कारण वाचून सरकेल तुमच्याही पायाखालची जमीन


Next Post
Screengrab: Twitter/@CowCorner9

भारताला नडणाऱ्या किवी गोलंदाजाला शुभमनने ठोकला कडक षटकार, कपिल यांची करुन दिली आठवण

Video: अर्धशतकवीर शुभमन गिलची कमजोरी झाली जगजाहीर! सतत एकाच प्रकारे होतोय बाद

Screengrab: Twitter/@WasimJaffer14

धुआं-धुआं था वो समा... धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143