भारतीय संघ बऱ्याच वर्षांनी वेस्ट इंडिजबरोबर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी कॅरेबियन बेटावर जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर हा भारताचा पहिलाच दौरा असून दुबळ्या वेस्ट इंडिज संघाबरोबर भारत किती फरकाने मालिका जिंकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आजपर्यन्तचा इतिहास पहिला तर १९८३ सालापासून भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये २९ सामने हे इंडिज संघाविरुद्ध खेळले आहेत. त्यात १० सामन्यात विजय, १८ सामन्यात पराभव तर एक सामन्यात निकाल लागू शकला नाही.
भारताने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध १९८२/८३ सालात पहिला एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळी पहिल्यांदा मजबूत असा वेस्ट इंडिज संघ घराच्या मैदानावर पराभूत झाला होता.
#१ १९८२/८३ तीन सामन्यांची मालिका इंडिजने २-१ अशी जिंकली.
#२ १९८८/८९ पाच सामन्यांची मालिका इंडिजने ५-० अशी जिंकली.
#३ १९९६/९७ पाच सामन्यांची मालिका इंडिजने ३-१ अशी जिंकली.
#४ २००२/०३ तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली.
#५ २००६/०७ तीन सामन्यांची मालिका इंडिजने २-१ अशी जिंकली.
#६ २००९/१० तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली.
#७ २००९/१० पाच सामन्यांची मालिका भारताने ३-२अशी जिंकली.
आजपर्यंत दोन देशात वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ७ मालिकेत भारताने ३ मालिका जिंकल्या असून ४ मालिकेत भारत पराभूत झाला आहे.