चीनमध्ये होऊ घातलेल्या हॅंगझू एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येकी 12 जणांच्या या संघात अनेक नामांकित खेळाडूंचा समावेश असून, काही दिग्गज खेळाडूंना संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले आहे. पुरुष संघाचे नेतृत्व पवन सेहरावत तर महिला संघाचे नेतृत्व अक्षिमा करेल.
भारतीय पुरुष संघात दिग्गज खेळाडूंपैकी कोणालाही संधी मिळालेली नाही. ट्रायल्समध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेले दीपक हुडा व परदीप नरवाल यांना संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले. महाराष्ट्राचा युवा रेडर आकाश शिंदे हा प्रथमच भारतीय संघाची जर्सी परिधान करताना दिसेल. त्या व्यतिरिक्त अस्लम इनामदार हा देखील महाराष्ट्राचा खेळाडू या संघात सामील आहे. महिला संघात महाराष्ट्राच्या स्नेहल शिंदे व सोनाली शिंगटे खेळताना दिसतील.
एशियन गेम्ससाठी भारतीय पुरूष संघ:
पवन सेहरावत, सुनील कुमार, अस्लम इनामदार, अर्जुन देशवाल, नवीन कुमार, सुरजीत सिंह, परवेश मलिक, नितेश कुमार, नितिन रावल, विशाल भारद्वाज, सचिन तंवर आणि आकाश शिंदे.
एशियन गेम्ससाठी भारतीय महिला संघ:
अक्षिमा, ज्योती, पूजा, पूजा कुमारी, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निधी शर्मा, सुषमा शर्मा, स्नेहल शिंदे आणि सोनाली शिंगटे
(India Kabaddi Squads Annouced For Asian Games Aakash Shinde Maiden Call Up)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य