---Advertisement---

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी टीम इंडिया घेणार ही खबरदारी

On: बुधवार, मार्च 11, 2020 8:31 PM
---Advertisement---

जगभरात कोरोना व्हायरसचा वेगवान प्रसार झाल्याने त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे.  अनेक क्रीडा स्पर्धांवर कोरोना व्हायरसची टांगती तलवार आहे. त्यातच गुरुवार(12 मार्च)पासून धरमशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेेला सुरुवात होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुरुवारी धरमशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आधी प्राणघातक कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून व्हाइट बॉल चमकण्यासाठी थुंकीचा वापर मर्यादित ठेवू, असे संकेत दिले आहेत.

“आम्ही या गोष्टीबद्दल विचार केला आहे (थुंकी न वापरणे) परंतु मी आत्ता म्हणू शकत नाही की आपण थुंकी वापरणार नाही. कारण जर आपण थुंकी वापरली नाही तर आम्ही बॉल कसा चमकवणार?  मग आमच्याकडून जास्त धावा गेल्यास लोक म्हणतील की आम्ही चांगली गोलंदाजी करत नाही, ”असे स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेनंतर संघात पुनरागमन करीत असलेला 31 वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने पत्रकार परिषदेत सांगितले.

भुवनेश्वर पुढे म्हणाला, “पण हा एक वैध मुद्दा आहे आणि आपण पाहूया, आज आमची संघाची बैठक होईल आणि आम्हाला ज्या काही सूचना मिळतील किंवा जे उत्तम पर्याय असेल ते करू. हे सर्व संघाचे वैद्यकिय पथकावर आम्हाला कोणता सल्ला देतात यावर अवलंबून आहे.”

“वैद्यकिय पथकाने आम्हाला काय करा आणि करू नका असे सांगितलेले आहे. स्वच्छता राखणे, नियमितपणे आपले हात धुणे आणि चाहत्यांकडे जाऊ नये यासारख्या साध्या गोष्टींचा यात समावेश आहे.”

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी याआधीच सांगितले की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यात हस्तांदोलन करण्याची प्रथा टाळणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 मार्चला धरमशाला येथे होणार आहे. तर दुसरा सामना 15 मार्चला लखनऊमध्ये आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकातामध्ये खेळण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर किंग कोहलीचा होऊ शकतो या दिग्गजांच्या यादीत सामील

किंग कोहलीला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

“भारताला भारतातच पराभूत करणे अशक्य”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---