भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हीने निवृत्त होण्याबाबत घोषणा केली आहे. २०२२चा हंगाम हा अंतिम असेल, अशी माहिती सानियाने दिली आहे. सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळत आहे. (Sania Mirza announces retirement)
6-time Grand Slam champion @MirzaSania to retire from professional tennis after the current season as per news reports.#SaniaMirza #tennis pic.twitter.com/Wkck135r90
— Rahul Trehan (@imrahultrehan) January 19, 2022
बुधवार (19 जानेवारी) रोजी सानिया ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर महिला दुहेरीत खेळली. यावेळी तिला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सानियाने, ‘आपण यावर्षीचा हंगाम खेळल्यानंतर निवृत्त होणार’ असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ २०२२ हे वर्ष सानियाचे टेनिस कोर्टवरील अखेरचे वर्ष असणार आहे. (India most successful female tennis player Sania Mirza announces retirement)
India's ???????? Most Successful Female #Tennis Player #SaniaMirza Announces #Retirement!
"I was very sure that this was going to be my last season when I started the year or even in December. Just the way my body is playing, I don't think I can finish the season." pic.twitter.com/o9fp8NEjGu
— SportsAppa | स्पोर्ट्सआप्पा (@SportsAppa) January 19, 2022
निवृत्त होण्याबाबत नेमकं काय म्हटलंय सानियाने?
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया तिची सहकारी किचेनोकसह महिला दुहेरीत सहभागी झाली होती. मात्र, यावेळी तिला हार पत्करावी लागली. सामना संपल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सानिया म्हणाली की, “वर्षाच्या सुरुवातीलाच मला याबाबत खात्री होती की हा हंगाम अथवा डिसेंबर महिना हा माझा टेनिस कोर्टवरील शेवटचा हंगाम असेल. मला हेही माहिती नाही की मी संपू्र्ण सिझन खेळू शकते की नाही”
सानियाची कामिगरी….
सानियाचा समावेश भारताच्या स्टार टेनिसपटूंमध्ये होतो. देशातील कित्येक युवा टेनिसपटूंसाठी सानिया ही एक आदर्श आहे. तिने आजवर 6 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यात 3 दुहेरी आणि 3 एकेरी आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हा सानियाचा पती आहे.
अधिक वाचा –
- “आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
- विराट आयुष्यात कधीच विसरणार नाही ‘१९ जानेवारी’, आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरताच बनणार खास रेकॉर्ड
- ऐतिहासिक ‘गॅबा’ विजयाची वर्षपूर्ती! जेव्हा भारताच्या जखमी वाघांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात केले परास्त