भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या तुफानी शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 9 बाद 385 धावा कुटल्या. मागील जवळपास महिनाभराच्या कालावधीत भारतीय संघाने खेळलेल्या 7 पैकी 5 वनडे सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना दरवेळी 340 पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली.
इंदोर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने तब्बल 1100 दिवसानंतर वनडे शतक साजरे केले. तर, गिलने आपला शानदार फॉर्म कायम राखत मागील चार सामन्यातील तिसरे शतक झळकावले. त्यानंतर हार्दिक पंड्याने ठोकलेल्या अर्धशतकामूळे भारतीय संघ 385 पर्यंत मजल मारू शकला. या धावसंख्येसोबतच भारतीय संघाने एका नव्या विक्रमाला देखील गवसणी घातली.
भारतीय संघाने यावर्षी 6 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 7 बाद 373 व तिरुअनंतपुरम येथे 5 बाद 390 अशी मजल मारलेली. या मालिकेतील कोलकाता येथील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला.
त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात हैदराबाद येथे भारताने 349 धावा उभ्या केलेल्या. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना केवळ 108 धावा उभ्या केल्या. त्यानंतर आता इंदोर वनडेत भारताने पुन्हा एकदा 385 अशी तगडी मजल मारली आहे. तत्पूर्वी, मागील वर्षीच्या अखेरच्या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळालेली. त्यावेळी देखील भारताने बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राम येथे 409 धावांचा पहाड उभा केला होता.
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना करत असलेल्या या शानदार कामगिरीमुळे गोलंदाजांवरील दडपण कमी होत आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतातच होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या दृष्टीने ही आकडेवारी भारतीय चाहत्यांसाठी सुखकारक असल्याचे दिसून येते.
(India Post 340 Plus Runs Everytime While First Batting In ODI Since December 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
यत्र तत्र सर्वत्र शुबमन गिल! 2022 पासूनचे आकडे पाहून नक्कीच वाटेल अभिमान