वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड पहिल्या उपांत्य सामन्यात समोरासमोर आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः धावांचा रतीब घालत 397 धावा केल्या. भारतीय संघासाठी विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी तुफानी शतके झळकावली. तर शुबमन गिल, केएल राहुल व कर्णधार रोहित शर्मा यांनी देखील महत्वाचे योगदान दिले.
Innings Break!
A stellar batting display by #TeamIndia as we set a target of 398 in Semi-Final 1! 🙌
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/FnuIu53xGu#CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/R4CKq3u16m
— BCCI (@BCCI) November 15, 2023
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याने स्वतः शुबमन गिल याच्यासह संघाला तुफानी सुरुवात केली. रोहितने 48 धावा केल्या. त्यानंतर गिल व विराट कोहली यांनी देखील शतकी भागीदारी केली. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे गिल 79 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर याने देखील आक्रमक भूमिका स्वीकारली.
विराट कोहली याने यावेळी वन डे क्रिकेट मधील आपले 50 वे शतक पूर्ण केले. त्याने 113 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने श्रेयस यांनी स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकावले. त्याने केवळ 70 चेंडूंमध्ये 105 धावा केल्या. केएल राहुल याने वीस चेंडूंमध्ये नाबाद 39 धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने विश्वचषक इतिहासातील बाद फेरीतील सर्वात मोठी धावसंख्या देखील उभारली.
(India Post 397 Against Newzealand In ODI World Cup Semi Final Virat Iyer Hits Century)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये
एक घाव, दोन तुकडे! वर्ल्डकपमध्ये जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितच्या नावे, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान