fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

स्मिथ- वार्नर संघात नव्हते ही काही आमची चूक नाही, माजी खेळाडू कडाडला

भारताने सोमवारी(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. यामुळे भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत असताना काहींनी भारताचा हा विजय कमकुवत संघाविरुद्ध मिळवला आहे अशी टिका केली आहे.

या टिकाकरांना भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी झापले आहे. तसेच यावेळी त्यांनी भारतीय संघाचे कौतुकही केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे आक्रमक फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर या दोघांवर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी 1 वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे हे दोघेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकले आहेत. यामुळे भारताने कमकुवत संघाविरुद्ध विजय मिळवला आहे अशी टिका काहींनी केली होती.

“ऑस्ट्रेलियन संघात स्मिथ आणि वॉर्नर हे दोघे नसणे ही काही भारतीय संघाची चूक नाही”, असे गावसकर सामना संपल्यावर सोनी सिक्सशी बोलत होते.

“ऑस्ट्रेलिया क्रिकेट त्या दोघांना कमी शिक्षा देऊ शकत होता पण बाकी खेळाडूंना यामधून बोध मिळावा म्हणून त्यांनी तसे केले नाही.”

“भारताने या मालिकेत उत्तम खेळ केला. आताच्या खेळाडूंनी त्यांचा फिटनेस योग्य ठेवत चांगली कामगिरी केली आहे. आम्हीही विजयासाठी खेळलो पण सध्याचा संघ वेगळा आहे”, असेही गावसकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने त्या खेळाडूवर भाष्य करुन जिंकली चाहत्यांची मनं

जगातील सर्वात फाॅर्ममध्ये असलेल्या क्रिकेटरने सचिन-कोहलीच्या विक्रमाला टाकले मागे

विराटने जेव्हा ट्राॅफी हातात घेतली तेव्हा मी रडत होतो

You might also like