भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला एका प्रशस्त अशा हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवले आहे. विशेष म्हणजे यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खास पेंटहाऊस मिळाले आहे, ज्यात तो क्वारंटाईन होणार आहे.
डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली एका खास पेंटहाऊसमध्ये राहणार आहे, जिथे ऑस्ट्रेलियन रग्बी दिग्गज ब्रॅड फिटलर राहायचा.
याव्यतिरिक्त भारतीय संघ पुढील दोन आठवड्यांसाठी ‘द पुलमॅन’ या हॉटेलमध्ये राहणार आहे. या हॉटेलमध्ये पूर्वी न्यू साऊथ वेल्स ब्लूचा रग्बी संघ राहत होता. ते आता दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झाले आहेत.
भारतीय संघाला १४ दिवसांच्या क्वारंटाईनदरम्यान प्रशिक्षण देण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंचे फोटोही शेअर केले आहेत.
Dubai ✈️ Sydney
Hello Australia! #TeamIndia is here! 💪 pic.twitter.com/Rfu0wZlXW0
— BCCI (@BCCI) November 12, 2020
विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर परतेल भारतात
कर्णधार विराट कोहली १७ ते २१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. हा भारतीय संघाचा परदेशातील पहिलाच दिवस- रात्र कसोटी सामना होणार आहे. विराट कोहलीला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पालकत्व रजा देण्यात आली आहे.
आयपीएलनंतर युएईहून परतलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू २२ नोव्हेंबरपासून त्यांच्या राष्ट्रीय संघाच्या शिबिरात सामील होतील. ते स्वतंत्र प्रशिक्षण घेतील.
दरम्यान काही भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत सिडनी येथे आले आहेत. तेदेखील क्वारंटाईन प्रोटोकॉलचे पालन करतील.
भारतीय संघ वनडे आणि टी२० मालिकेसाठी घालणार खास जर्सी
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेसाठी सत्तरच्या दशकातून प्रेरित असलेली ‘रेट्रो’ थीम जर्सी घालेल. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) असेल. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्सचे नावही असेल. मागील महिन्यातच बीसीसीआयने एमपीएलला नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने ऑस्ट्रेलियाला चोपले, तीच जर्सी घालणार टीम इंडिया
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
-भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर