भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीचे आगमन झाले आहे. हा पवित्र सण शनिवारी (१४ नोव्हेंबर) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येईल. या दिवशी सर्व लोक आपापल्या कुटुंबासोबत मिळून दिवे लावतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. परंतु भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहोचला आहे. अशामध्ये भारतीय संघातील खेळाडू दिवाळी कसे साजरी करणार असा प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावत असेल. परंतु भारतीय संघातील खेळाडूही ऑस्ट्रेलियात दिवाळी साजरी करणार आहे.
सामान्य स्थितीत जेव्हा भारतीय संघ दिवाळीच्या वेळी परदेशी दौऱ्यावर असतो, तेव्हा त्या देशातील भारतीय उच्च आयोग (भारतीय हाय कमिशन) भारतीय संघाला डिनरला बोलावतात. परंतु यावेळी कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघ सिडनी येथील आपल्या हॉटेलमध्येच राहणार आहे.
हॉटेलमध्येच करणार दिवाळी साजरी
भारतीय संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन हॉटेलमध्येच एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करेल. यामध्ये सर्व खेळाडू मिळून दिवाळी साजरी करतील. भारतीय संघाचे काही खेळाडू अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. त्यांचे कुटुंबही दिवाळीच्या या उत्सवात सामील होतील.
भारतीय संघ या संपूर्ण दौऱ्यावर तीन वनडे सामने, तीन टी२० सामने व चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरला वनडे मालिकेने होईल, तर १७ डिसेंबरपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना हा दिवस- रात्र कसोटी सामना असेल. यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबर, तिसरा कसोटी सामना ७ जानेवारी आणि १५ जानेवारीपासून खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
-संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर