एॅडलेड मध्ये खेळण्यात आलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने 8 गडी राखून जिंकला. भारत या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आघाडीवर होता. परंतु ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार पुनरागमन करताना भारतीय फलंदाजाची कंबरडे मोडत सामन्यात आपला दबदबा निर्माण करून भारतीय संघाचा 36 धावात फडशा पाडला.
भारतीय संघाचे फॅन खराब कामगिरीमुळे निराश झाले. मात्र संघाला समर्थन देण्यात मागे पडले नाही. जगभरात कोणत्याही मैदानावर सामना असला तरी भारतीय संघाचे फॅन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतात. या भारत आर्मीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर बुमराहच्या एका छोट्या फॅनचा शानदार व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ सामन्याच्या दुसर्या दिवशीचा आहे. जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावसंख्येवर रोखले होते. या दरम्यान बुमराहने महत्त्वपूर्ण दोन गडी बाद केले होते.
या दरम्यान एक छोटा फॅन बुमराहला चीयर करताना दिसून येत आहे. तो आपल्याच शैलीत बुमराह – बुमराह म्हणत होता. भारत आर्मीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करताना सांगितले की या छोट्या फॅनचे नाव जियान आहे. भारत आर्मीने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना कॅप्शन मध्ये लिहले आहे की, ‘पहिली कसोटी दुसरा दिवस : जियानला भेटा’, जो जसप्रीत बुमराहचा भारत आर्मी एॅडलेड मधून खुप मोठा फॅन आहे’, बुमराह – बुमराह!
#AUSvIND 1st Test Day 2 : Meet Jiyaan one of @Jaspritbumrah93 biggest fan’s from Bharat Army Adelaide!
🗣 Bumrahhhh Bummrahhhh!#BharatArmy #BAFamily #COTI 🇮🇳 pic.twitter.com/LRWv1DBdXw
— The Bharat Army (@thebharatarmy) December 18, 2020
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ढासळला ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. त्याचबरोबर या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता या मालिकेतील तीन सामने उरले आहेत. दुसरा सामना 26 डिसेंबरला खेळला जाईल. हा सामना ऐतिहासिक मैदानात मेलबर्न येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.