कोरोनामुळे 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी फारसे आशादायी ठरले नाही. क्रिकेटचा विचार केला असता येथेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .जवळजवळ ६ ते ७ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णतः बंद होते. क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतरही खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक कष्ट घ्यावे लागत आहेत. विविध कोरोना चाचण्या व क्वारंटाईन मुळे अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या मालिकेतून माघार घेतली आहे.
खेळाडूंना यावेळी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे देखील अशक्य बनले आहे. अनेक खेळाडू हे मागील बऱ्याच महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत ,व आपल्या कुटुंबापासून दूर आहेत . यातच बातमी समोर येत आहे की ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन स्टीव स्मिथ हा मागील ४ महिन्यांपासून आपल्या पत्नीला भेटलेला नाही.
स्मिथ मागील बऱ्याच महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे . जून-जुलै दरम्यान झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर तो थेट यूएई मध्ये आयपीएल खेळण्यासाठी रवाना झाला. आयपीएल नंतर तो ऑस्ट्रेलियात भारताविरुद्धच्या वनडे, टी-20 व कसोटी मालिकेमध्ये खेळत आहे. त्यामुळे स्मिथला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवणे शक्य झाले नाही. मात्र आता स्मिथ साठी आनंदाची बातमी समोर येत असून, स्मिथची पत्नी डॅनी विलिसने नुकतीच आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट टाकली आहे व त्यात तिने स्पष्ट केले आहे की एका दिवसानंतर ती आपल्या पतीला भेटणार आहे. या दोघांसाठी हा भावनिक क्षण असणार आहे. स्मिथ व डॅनी हे ख्रिसमस वेळीही एकत्र भेटू शकले नव्हते . पतीसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी डॅनी सिडनी येथून मेलबर्न येथे रवाना देखील झाली होती . मात्र दिला स्मिथला भेटण्याची परवानगी मिळाली नाही .अखेर तिला आनंदाची बातमी मिळाली असून एक दिवसानंतर ती स्मिथला भेटणार आहे.
दरम्यान स्मिथच्या क्रिकेट कामगिरीचा विचार केला असता तो सध्या खराब फॉर्म मधून जात आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्मिथ पूर्णतः फ्लॉप ठरला असून , त्याने ४ डावांत मिळून केवळ १० धावा बनवल्या आहेत. स्मिथ २०१९ साली झालेल्या अॅशेस मालिकेनंतर केवळ ३० च्या सरासरीने धावा बनवत आहे, त्यामुळे स्मिथ चा फॉर्म संघासाठी डोकेदुखी ठरत आहे .७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात स्मिथ उत्तम कामगिरी करेल अशी आशा ऑस्ट्रेलियन संघाला असेल .
महत्वाच्या बातम्या:
– एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे, पाहा कोणी केलंय हे भाष्य
– म्हणून आयसीसीला मागावी लागली बेन स्टोक्सची माफी
– टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू करतोय पुनरागमन