भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. हे सर्व सामने ऑस्ट्रेलिया देशात खेळले जात आहेत. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे. त्याचबरोबर दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. मात्र सध्या तिथे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यापूर्वी 3 दिवस अगोदर सिडनीत जाणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेवर कोरोना व्हायरसचा धोका घोंघावत आहे. सध्या सिडनीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दोन्ही संघाला सराव करण्यासाठी मेलबर्न येथेच थांबण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. यामुळे तिसरा सामना रोमांचक होणार आहे. मात्र त्यावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मेलबर्न येथे सराव करतील. त्याचबरोबर ज्यादिवशी तिसरा सामना खेळवला जाणारा आहे त्यापूर्वी 3 दिवस अगोदर दोन्ही संघ सिडनीसाठी रवाना होतील.
नेहमी प्रमाणे दोन्ही संघ सिडनीसाठी नवीन वर्षाच्या आदल्या रात्री जाणार होते. मात्र या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता उशिरा जाणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हाॅक्ले म्हणाले, “मंगळवारी रात्री घोषणा करण्यात आली आहे की तिसरा कसोटी सामना सामना सिडनीत होईल. आम्ही त्यानुसार योजना बनवत आहोत. त्यामुळे खेळाडू अजून काही दिवस मेलबर्न मध्येच राहतील. त्यानंतर सामना सुरू होण्याच्या अगोदर काही दिवस सिडनीत जातील.”
अनेक चर्चा झाल्यानंतर मंगळवारी रात्री तिसरा कसोटी सामना सिडनीत होणार अशी घोषणा करण्यात आली. हाॅक्ले म्हणाले यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रसारण दल सुरक्षितपणे चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेन येथे पोहोचू शकतील.
तत्पूर्वी दुसर्या सामन्यात भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढताना चौथ्या दिवशी 8 विकेट्सने विजय मिळवला. यामधे ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 70 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 2 गडी गमावून 70 धावा करत विजय मिळवला. या सामन्यातील विजयी धाव प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया सोबत बरोबरी केली.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय