भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेत विजय मिळवला आहे. त्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडचा संघासोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जाणारी कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असणार आहे. मात्र ही मालिका सुरू होण्याअगोदर बीसीसीआय भारतीय चाहत्यांना एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आगामी कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत विचार करत आहे.
बीसीसीआय 50% चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याच्या विचारात
भारत आणि इंग्लंड संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जातील. त्यामुळे या दोन स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी बीसीसीआय कडून परवानगी देण्याचा विचार केला जात आहे. या स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या पैकी 50 %प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी देण्याचा विचार केला जात आहे.
ऑस्ट्रेलियाने चाहत्यांना मैदानावर येण्याची परवानगी दिली होती
उल्लेखनीय म्हणजे कोरोनाच्या काळानंतर ऑस्ट्रेलियाने सर्वात पहिल्यांदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी परवानगी दिली होती. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची परिस्थिती बघता, आम्ही कसोटी सामन्यासाठी फक्त 50%प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्याबाबत विचार करत आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय याबाबत सामना ज्या प्रदेशात होणार आहे. तेथील आरोग्य अधिकार्यांसोबत चर्चा करत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रकरणांवर सुद्धा लक्ष ठेवून आहे. जर चेन्नई आणि अहमदाबाद येथील परिस्थिती बदलली, तर त्याबाबतचे निर्णय सुद्धा बदलले जातील. बीसीसीआयच्या अधिकार्याचे मत आहे की, जर बीसीसीआयने या कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली, तर आयपीएलस्पर्धा सुद्धा प्रेक्षकांनाच्या उपस्थित खेळली जाईल.
त्याचबरोबर आगामी कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय चेन्नई आणि अहमदाबादमध्ये वेगवेगळे दोन जैव सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची तयारीत आहे. त्यामुळे दोन्ही संघाना या मालिकेच्या प्रवासासाठी चार्टर्ड फ्लाइटने प्रवास करावा लागेल.
इंग्लंड संघ भारताच्या दौर्यावर 4 कसोटी, 5 टी-20, आणि 3 वनडे मालिका खेळण्यासाठी येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…
फक्त ‘एमएस धोनी’ चित्रपटच नाही, सुशांतने केले क्रिकेटवर आधारीत आणखी एका चित्रपटात काम
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ‘हिटमॅन’चं भारतात आगमन, फोटो तूफान व्हायरल