दोन महिन्यांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये संमिश्र यश मिळाले आहे. टी२० मालिका ५-० अशी जिंकल्यानंतर संघाने वनडे मालिका ०-३ अशी गमावली. यामुळे वनडेत गेली काही वर्ष जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सध्या चौफेर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ २१ फेब्रुुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
या दौऱ्यातील कसोटी मालिका ही टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असून टीम इंडिया यात दोन कसोटी सामने खेळणार आहे.
पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टन येथे तर दुसरा सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान ख्रायस्टचर्च येथे होणार आहे.
यापुर्वी १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान भारतीय संघ तीन दिवसीय सराव सामना न्यूझीलंड ११ संघाविरुद्ध हॅमिल्टन येथे खेळणार आहे.
कसोटी मालिका –
21 – 25 फेब्रुवारी – पहिली कसोटी – बासिन रिसर्व, वेलिंग्टन
29 फेब्रुवारी – 4 मार्च– दुसरी कसोटी – हॅगली ओव्हल, ख्रिस्टचर्च