Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुन्हा रंगणार भारत विरूद्ध पाकिस्तान थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या फायनलची समीकरणे

पुन्हा रंगणार भारत विरूद्ध पाकिस्तान थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या फायनलची समीकरणे

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Ind-vs-Pak

Photo Courtesy: Twitter/ICC


टी20 विश्वचषक 2022 हा उलटफेरांनी भरलेला विश्वचषक ठरला आहे. या विश्वचषकात खूप मोठे उलटफेर बघण्यास मिळाले. आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केले, झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि आता विश्वचषकाच्या महत्वाच्या टप्प्यावर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यामुळे उपांत्य फेरीची सर्व समीकरणेच बदलली. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची दारे उघडली आहेत. या विश्वचषकात कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघानी मोठ्या संघांचा चांगलाच बाजार उठवलाय. त्यामुळे पुढच्या वेळी अशा संघांना हलक्यात घेण्याची चूक कोणताही मोठा संघ करणार नाही.

टी20 विश्वचषक 2022मध्ये भारताचा शेवटचा साखळी सामना रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) झिम्बाब्वेशी झाला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात निराशाजनक झाली सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) 13 चेंडूत 15 धावा करत बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डाव सावरला. विराटने 25 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याने फक्त 25 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्यामुळे भारताला 186 धावांचा डोंगर उभारता आला.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. त्यांनी दोन गडी झटपट गमावले. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. तसेच, पूर्ण संघ 115 धावांवर गडगडला. भारताकडून आर अश्विन (Ravichandran Ashwin) याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. भारताने 71 धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवला. या विजयानंतर भारत गट 2च्या पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.

For his breathtaking batting pyrotechnics, @surya_14kumar bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Zimbabwe by 7⃣1⃣ runs at the MCG👏 👏

Scorecard 👉 https://t.co/shiBY8Kmge #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/k236XjavDv

— BCCI (@BCCI) November 6, 2022

विश्वचषकाच्या सुपर12 फेरीतील सामने खेळून झाले आहेत. भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवल्यानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघांचे स्थान निश्चित झाले आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना बुधवारी (दि. 9 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात सिडनी येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड (India vs England) या संघांमध्ये ऍडलेड येथे खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

विश्वचषकाच्या या उपांत्य फेरीत जर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवले आणि भारताने इंग्लंडला हरवले, तर क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबल्याचा थरार पुन्हा अनुभवायला मिळेल. विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न येथे दुपारी 1.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळवला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशचं नशीबच खराब! थर्ड अंपायरच्या चुकीमुळे कर्णधाराला पकडावा लागला तंबूचा रस्ता
ज्यांना चाहते मानायचे आदर्श, त्याच खेळाडूंनी केली होती हद्द पार; सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने लागलेली वाट


Next Post
Captain-Babar-Azam

एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, 'आता आम्हाला चढलाय जोश'

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल 'हा' महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत

Shoaib-Akhtar

शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे 'सी' आहात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143