धरमशाला। श्रीलंका संघ सध्या भारत दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. हा सामना लखनऊ येथे झाला होता. आता या मालिकेतील उर्वरित २ सामने धरमशाला येथे होणार आहेत.
मालिकेतील स्थिती
भारतीय संघ लखनऊ येथे झालेला पहिला टी२० सामना जिंकलेला असल्याने मालिकेत १-० असा अघाडीवर आहे. त्यामुळे आता भारताकडे दुसरा टी२० सामना जिंकून मालिका खिशाल घालण्याची संधी असणार आहे, तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी साधून आपले आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
अंतिम ११ जणांच्या संघात होणार बदल?
टी२० मालिकेपूर्वी भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याचमुळे भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच श्रीलंकाही आपल्या ११ जणांच्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पहिल्या टी२० सामन्यात खेळलेलेच दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यातही खेळताना दिसू शकतात.
आमने-सामने कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका संघात २३ सामने झाले आहेत. त्यातील १५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच ७ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल (2nd T20I) जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना २६ फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
५. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, मयंक अगरवाल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई
श्रीलंका संघ – पाथम निसंका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, दिनेश चंडीमल(यष्टीरक्षक), दसुन शनका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफ्री वेंडरसे, लाहिरू कुमारा, धनंजय डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला, दनुष्का गुलतिलका, बिनुरा फर्नांडो, अशियान डॅनियल, शिरान फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून ऋतुराज गायकवाड बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली टीम इंडियात संधी
अर्रर्र झाला ना घोळ! युझवेंद्र चहलला शुभेच्छा देताना राजस्थान रॉयल्सने केली ‘ही’ मोठी चूक
प्रो कबड्डी फायनल : पाटना पायरेट्सला लोळवत दबंग दिल्ली विजयी, प्रथमच पटकावले विजेतेपद