भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. त्याने दाखवून दिले की, त्याला ‘रनमशीन’ का म्हणतात. विराटने तब्बल 55 महिन्यांची परदेशात शतक झळकावण्याची प्रतीक्षा वेस्ट इंडिज दौऱ्यावर संपवली. विराटने पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावले. हे त्याचे कसोटीतील 29वे शतक होते. शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी म्हटले की, त्याच्यासाठी हे सर्व महत्त्वाचे नाहीये.
काय म्हणाला विराट?
‘किंग’ कोहली नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपल्या शतकाविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी फक्त संघासाठी योगदान देऊ इच्छितो. जर मी 50 धावा केल्या असत्या, तर शतक हुकले असते. आणि मी 120 धावा केल्या असत्या, तर द्विशतक हुकले असते. अशात हे आकडे आणि कामगिरी माझ्यासाठी जास्त महत्त्वाची नाहीये. तुम्ही कशाप्रकारे संघाच्या विजयात योगदान देता, हे जास्त महत्त्वाचे असते.”
‘माझ्यासाठी फिटनेस सर्वात महत्त्वाची’
विशेष म्हणजे, हा विराट कोहलीचा 500वा सामना (Virat Kohli’s 500th match) होता. या खास सामन्यात शतक झळकावल्यानंतर पुढे बोलताना विराट म्हणाला की, “माझ्यासाठी जी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती फिटनेस आहे. त्यामुळे मला सातत्याने चांगले बनण्यात मदत मिळते. देशासाठी 500 सामने खेळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. हे सर्वकाही मी माझ्या मोठ्या मेहनतीने मिळवण्यात यशस्वी होऊ शकलो. मी कधीच या ठिकाणी पोहोचण्याबद्दल विचार केला नव्हता.”
भारताचा डाव, विराटचे शतक
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा पहिला डाव 438 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये विराट कोहली याच्या 121 धावांचा समावेश होता. विराटने 206 चेंडूंचा सामना करताना 11 षटकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली होती. तसेच, कर्णधार रोहित शर्मा 80, रवींद्र जडेजा 61, यशस्वी जयसवाल 57 आणि आर अश्विन याने 56 धावांची शानदार खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने 1 विकेट गमावत 86 धावा केल्या आहेत. (india vs west indies 2nd test virat kohli statement after century says this know here)
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात चोपल्या 438 धावा, वाचा दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं
ऍशेस 2023: मॅंचेस्टर कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड, बॅझबॉल फलंदाजीनंतर गोलंदाजांचा कहर