Loading...

रनमशीन कोहली या मोठ्या विक्रमापासून आहे केवळ २५ धावा दूर

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs Windies) यांच्यात तीन टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा दुसरा सामना रविवारी(8 डिसेंबर) होणार आहे. हा सामना ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.

Loading...

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात जर विराटने 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारतात 1000 धावा पूर्ण करेल.

तसेच मायदेशात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू तर जगातील एकूण तिसराच क्रिकेटपटू ठरेल. याआधी असा विक्रम न्यूझीलंडचे फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आणि कॉलिन मुनरो(Colin Munro ) यांनी केला आहे. 

सध्या विराटने भारतात खेळताना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 28 सामन्यात 975 धावा केल्या आहेत. तर गप्टिलने न्यूझीलंडमध्ये खेळताना 1430 धावा केल्या आहेत आणि मुनरोने 1000 धावा केल्या आहेत. 

Loading...

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये मायदेशात सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

1430 – मार्टिन गप्टिल

1000 – कॉलिन मुनरो

Loading...

975 – विराट कोहली

You might also like
Loading...