fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू

क्रिकेट विंडिजने भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. विंडिजचा संघ भारताविरूद्ध 21 आक्टोबरपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. 4 नोव्हेंबरपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

विंडिजच्या संघातून अनुभवी सलामीवीर ख्रिस गेलसह अष्टपैलू ड्वेन ब्रॅव्होला संघातून वगळण्यात आले आहे. ब्रॅव्होला पुन्हा संघात स्थान मिळविण्यासाठी अजून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर अफगाणिस्तान प्रिमियर लीग खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे ख्रिस गेलला संघातून वगळण्यात आले आहे.

भारत दौऱ्यावर आलेल्या विंडिजच्या संघाची कामगिरी खुपच सुमार होत आहे. विंडिजचे महत्वाचे खेळाडू कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फारसे उत्सूक नसतात. मात्र मर्यादीत षटकांच्या सामन्यात संघात स्थान मिळवण्यासाठी विंडिजचे खेळाडू धडपड करीत असतात.

डॅरेन ब्रॅव्हो आणि केराॅन पोलार्डला संघात स्थान देण्यात आले आहे. दोन्ही खेळाडूंनी आताच संपलेल्या कॅराबियन प्रिमिअर लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. डॅरेन ब्रॅव्हो दोन वर्षानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे खेळणार आहे.

भारताविरूद्धच्या वन-डे मालिकेत विंडिजचे नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे. 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार पदाची धुरा कार्लस ब्रेथवेटकडे सोपण्यात आली आहे.

वन-डे मालिकेसाठी विंडिजचा संघ-

जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन अॅलन, सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाई होप, अल्झरी जोसेफ, इव्हिन लुईस, अॅशले नर्स, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमर रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशने थॉमस.

 

टी-20 मालिकेसाठी विंडिजचा संघ-

कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), फॅबियन अॅलन, डॅरेन ब्राव्हो, शिमरन हेटमीर, इव्हिन लुईस, ओबेड मॅकॉय, ऍशले नर्स, कीमो पाॅल, खारी पियरे, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, ओशने थॉमस.

महत्वाच्या बातम्या-

You might also like