मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा इतिहासही भारताने रचला आहे.
याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 1985ची वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2008ची सीबी मालिका जिंकली आहे. सीबी मालिकेत तीन संघ खेळायचे.
भारतीय संघाची ही ऑस्ट्रेलियामधील दुसरीच द्विपक्षीय वनडे मालिका आहे. 2016ला झालेल्या पहिल्या द्विपक्षीय वनडे मालिकेत भारताला 4-1ने पराभूत व्हावे लागले होते.
आज भारताकडून एमएस धोनी आणि केदार जाधवने अर्धशतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. या सामन्यात धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावा आणि केदारने 57 चेंडूत 61 नाबाद धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहलीनेही 46 धावा करत चांगली खेळी केली होती.
तत्पूर्वी भारताकडून युजवेंद्र चहलने 42 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–चार वर्षांनंतर धोनीने केली त्या पराक्रमाची पुनरावृत्ती
–धोनीने भारताच्या या दिग्गजाचाही विक्रम टाकला मागे, आत्ता फक्त सचिन तेंडुलकर आहे पुढे
–कोहली, तेंडुलकर प्रमाणे एमएस धोनीनेही केला ऑस्ट्रेलियामध्ये ‘तो’ कूल विक्रम