दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपला पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळला. केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत करत विश्वचषकात विजयी सुरुवात केली. जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोष यांनी विजयात निर्णयाक भूमिका बजावली.
What a run chase! 🔥
The second-highest successful run-chase in Women's #T20WorldCup history 💥#INDvPAK | #TurnItUp pic.twitter.com/eWJ6dBxCQ3
— ICC (@ICC) February 12, 2023
उभय संघांनी या सामन्यातून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा हिच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाला सुरुवातीला आक्रमक खेळ करता आला नाही. त्यांनी 7.3 षटकात 3 बाद 43 अशी मजल मारली होती. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफने एक बाजू लावून धरत संघाचा धावफलक हलता ठेवला होता.
भारतीय संघ पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखणार असे वाटत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयेशा नजीम हिने आक्रमक खेळ दाखवला. तिने मारूफसह अखेरपर्यंत नबाद राहत 25 चेंडूंवर 43 धावांची वेगवान खेळी केली. तर, मारूफने नाबाद 68 धावा करत संघाला 149 पर्यंत मजल मारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला शफाली वर्मा व यास्तिका भाटियाने 5.3 षटकात 38 धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर शफालीने जेमिमासह धावांचा वेग वाढवला. शफालीने 33 धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीतने आक्रमक 16 धावांचे योगदान दिले.
हरमन बाद झाल्यानंतर सामना पाकिस्तानच्या दिशेने झुकला असतानाच यष्टीरक्षक रिचा घोष हिने पाकिस्तान संघावर प्रती आक्रमण केले. तिने पाच चौकार वसूल करत पाकिस्तानच्या आव्हानातील हवा काढून घेतली. जेमिमाने विजयी चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने 38 चेंडूवर नाबाद 53 व रिचाने 20 चेंडूवर 31 नाबाद 31 धावा करत संघाला एक शतक राखून विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा पुढील सामना वेस्ट इंडिजशी होईल.
(India Womens Beat Pakistan Womens In T20 World Cup By 7 Wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच